“देवेंद्र फडणवीस भांग पीत नसतील, पण…”

On: October 21, 2023 12:43 PM
Devendra fadnavis
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार (Shiv Sena Uddhav Thackeray) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ड्रग्ज प्रकरणावरून (Drugs Case) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दादा भुसेंवर (Dada Bhuse) जोरदार निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका, ते पण भरकटलेले आहेत. ते भांग पीत नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. अशी जी माणसं आहेत, जी नशेच्या बाजारात फिरत आहेत. त्या नशेबाजांमुळे त्यांची मती गुंग झाली, असल्याची टीका संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था पाहिली. सुडाने कधीही कारवाया केल्या नाहीत, आजूबाजूला बसलेल्या गुंड, मवाली, माफियांची बाजू देवेंद्र फडणवीस घेत असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.

गृहमंत्र्यांकडे इतर सगळी माहिती असते, मात्र माफी यांची माहिती नसते इतर काही घटना घडली की, विरोधकांवर टीका करायची, मात्र हा महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे. ड्रग्स गुजरात मधून येत आहे, गुजरातची बाजू घेत आहेत का? की आमदारांची बाजू घेत आहेत, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now