… त्या गोष्टीसाठी भाजप शिंदे व अजित पवारांचा पक्ष फोडेल!

On: November 26, 2024 1:32 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut l विधानसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींचा मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “भाजपकडे बहुमत आहे आणि जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर ते बहुमत कसं मिळवायचं? तसेच कोणाला तोडायचं आणि कोणाला खरेदी करायचं ? यामध्ये ते माहिर असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

बहुमतासाठी भाजप शिंदे यांची पार्टी सुद्धा तोडू शकतो :

संजय राऊत म्हणाले की, बहुमतासाठी भाजप पक्ष हा एकनाथ शिंदे यांची पार्टी सुद्धा तोडू शकतो आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी देखील तोडू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री हा भाजप पक्षाचाच व्हायला पाहिजे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील असेही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच 2019 साली अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युला आम्ही सांगत होतो, तेव्हा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मात्र मान्य नव्हता. तसेच त्यांनी तेव्हा अडीच वर्ष फॉर्मुला मान्य केला असता तेव्हा पुढल्या अनेक घडामोडी देखील टाळता आल्या असत्या.

Sanjay Raut l त्यावेळी अडीच वर्षाचा फॉर्मुला पाळला नाही :

परंतु फक्त शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्यांना त्रास द्यायचा होता. तसेच त्यांना शिवसेना हा पक्ष फोडायचा होता म्हणून त्यांनी तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्मुला पाळला नाही आणि आता ते सर्व काही करायला देखील तयार आहेत. मात्र, यातून लक्षात घ्या की महाराष्ट्र विषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

News Title – Sanjay Raut claim for bjp 

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

सरकारकडून Pan Card संबंधी मोठा बदल; जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, कारण..

नागराज मंजुळेंच्या अडचणीत मोठी वाढ; नेमकं काय प्रकरण?

गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर

राज्याला मिळणार ओबीसी मुख्यमंत्री?, नव्या मागणीची जोरदार चर्चा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now