मोठी बातमी! शिंदे गटाच्या मंत्र्याचा भीषण अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक

On: October 4, 2024 8:06 AM
Sanjay Rathod Accident
---Advertisement---

Sanjay Rathod Accident | शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांच्या कारचा काल 3 ऑक्टोबररोजी अपघात झाला.पोहरादेवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारला मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान अपघात झाला. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला. यामध्ये सुदैवाने संजय राठोड बचावले आहेत. मात्र, पिकअपचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. (Sanjay Rathod Accident )

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोहरादेवीला नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येथून परतत असताना संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाला.

संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात

पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथून रात्री 2 ते अडीच वाजेदरम्यान निघाले होते. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. मात्र आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. हा अपघात खूप भीषण होता.

अपघातात संजय राठोड यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले आहे. तर, पिकअप वाहन पलटी झाले. ज्यामुळे पिअकपचा चालक जखमी झाला. रात्री दोन ते अडीच वाजता ही घटना घडली.पिकअपच्या चालकाला पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनानं उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आलं आहे. (Sanjay Rathod Accident )

पिकअपमधून केळीची वाहतूक सुरु होती. व्यापाऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेली केळी दुसऱ्या गाडीत भरून ती पोहरागडला पाठवण्यात आली. या अपघातमध्ये संजय राठोड हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.

News Title :  Sanjay Rathod Accident

महत्वाच्या बातम्या –

आज ‘या’ राशींवर राहणार देवी ब्रह्मचारिणीची कृपा!

राजकीय भूकंप! भाजपचा ‘हा’ बडा नेता ‘तुतारी’ हाती घेणार?

पुण्यातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला केली स्थानिक नेत्यांनी मदत!

नवरात्रोत्सवात शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

‘हिंदू समाज हा महामूर्ख’ संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now