“तुला बायको ना मुलगी, ना संसार,भटका माणूस..”; संभाजी भिडेंचा कुणी घेतला समाचार?

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रचलित आहेत. नुकतंच त्यांनी महिलांबाबत मोठं भाष्य केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, असं संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले आहेत.त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद उफाळला आहे.

यावरच आता महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. आंबेवाल्यांनी आम्हाला संस्कृती शिकवू नये, असं पुणे शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संगीता तिवारी यांनी म्हटलं आहे. तसेच भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही संगीता तिवारी यांनी केली आहे.

कॉँग्रेसकडून जोरदार टीका

“नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणारे आंबे वाले भिडे असं म्हणतात की वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ह्या बाबाला काय माहिती आहे?, हा महिलांचा सण आहे, त्या सण साजरा करणारच. ह्या आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये.”, असं संगीता तिवारी म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, “भिडे म्हणतात, ड्रेस मटेरियल घालून महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये. अरे बाबा, तुला बायको ना मुलगी, ना तुला संसार, भटका माणूस आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. अतिशय बिनडोकपणाचे विधान हा आंबेवाला कायम करतो. महिलांच्या बाबत असं बोलण्याचा ह्या आंबेवाल्याला (Sambhaji Bhide) कोणी अधिकार दिला आहे?”, असा संताप संगीता तिवारी यांनी व्यक्त केलाय.

“आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर आंबेवाले भिडे म्हणतो की आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य हांडगे आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. ह्याचे हे वक्तव्य देशाचा अपमान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी यातना भोगल्या, जेलमध्ये गेले, फासावर चढले आणि हा माणूस सरळ हांडगा आणि दळभद्री स्वातंत्र्य म्हणत आहे.”, अशी संतप्त प्रतिक्रिया संगीता तिवारी यांनी दिली आहे.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?

वटसावित्रीच्या पूजेला नटींनी जाऊ नये, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. ड्रेस परिधान केलेल्या महिलांनीदेखील वटसावित्रीसाठी जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनीच वटसावित्रीला जावं, असे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले आहेत.

तसंच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडगे आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत, ह्या व्रताची पथ्य आहेत, असं संभाजी भिडे म्हणालेत. याचबरोबर ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली अशा 10 – 10 हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार असल्याचे देखील तेम्हणाले आहेत.

News Title –  Sangita Tiwari Criticised Sambhaji Bhide

महत्वाच्या बातम्या-

तृणमूल नेत्याची भर रस्त्यात महिलेला अमानुषपणे मारहाण; व्हिडिओ व्हायरल

“हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, समजने वाले को इशारा काफी”

सूर्याच्या कॅचवरून आफ्रिकन चाहत्यांचे सवाल; माजी दिग्गज खेळडूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; LPG सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त

‘वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली….’; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांनी खळबळ