भुजबळ बंडखोरीवर ठाम, नांदगावमध्ये महायुतीचं टेंशन वाढणार?

On: October 24, 2024 10:59 AM
Sameer Bhujbal may fight as an independent
---Advertisement---

Sameer Bhujbal | विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, यादी जाहीर होताच पक्षात बंडखोरीला सुरुवात झाल्याचं चित्र काही मतदारसंघात दिसून येत आहे. अशात नांदगाव मतदारसंघात महायुतीचं टेंशन वाढवणारी बातमी समोर येत आहे. युतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा येथे तिकीट देण्यात आलंय. (Sameer Bhujbal)

मात्र, याच जागेवर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal)देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे असून त्यांनी महायुतीविरोधात बंड पुकारलं आहे. येत्या 28 ऑक्टोबरला समीर भुजबळ हे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची माहिती आहे. समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं बोललं जातंय.

समीर भुजबळ अपक्ष लढणार?

त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “समीर भुजबळ कधी तुतारीकडे जाणार कधी म्हणे मशालकडे जाणार ही चर्चा तुम्हीच केली होती. पण, तो आहे तिथेच आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तो उपस्थित राहणार आहे. तो अपक्ष लढणार हे मला सांगितले नाही. तुम्हाला कसे सांगितले मला कल्पना नाही. आता ते स्वतःचा निर्णय घेण्यासाठी निर्णयक्षम आहेत.”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. (Sameer Bhujbal)

दरम्यान, अजित पवार गटाकडून येवला येथे छगन भुजबळ निवडणूक लढणार आहेत. आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं वक्तव्य केलं. “महायुती आणि आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने आदेश दिल्याने मी पुन्हा निवडणुकीला उभा राहिलोय. तुमच्या आशीर्वादाने आणखी पाच वर्ष विधानभवनात बसणार आहे. लोकसभेच्या वेळी महायुतीला फार मोठा सेटबॅक बसला. पण, आता आमची खात्री झाली आहे की, महायुतीचं शासन पुन्हा एकदा येईल.”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

शिंदे गटाचं टेंशन वाढणार?

दुसरीकडे त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे बंडखोरीवर ठाम असल्याचं म्हटलं जातंय. नांदगाव मतदारसंघातून सध्या सुहास कांदे हे आमदार आहेत. या निवडणुकीत देखील सुहास कांदेंनाच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. अशात समीर भुजबळ जर अपक्ष लढले तर त्याचा थेट परिणाम हा महायुतीच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचं आता टेंशन वाढू शकतं.  (Sameer Bhujbal)

उमेदवारी नाकारल्यानंतर निवडणूक लढवायची किंवा नाही, हा माझा अधिकार आहे, त्यामुळे विधानसभेत आपण नांदगावमधून वेळ पडल्यास अपक्ष निवडणूक लढवणार, असं समीर भुजबळ मागे म्हणाले होते. आता ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

News Title :  Sameer Bhujbal may fight as an independent

महत्वाच्या बातम्या-

AB फॉर्म म्हणजे नेमकं असतं तरी काय?, निवडणुकीत याला इतकं महत्व का?

‘या’ मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना; पाहा कुणाचं पारडं भारी?

आज गुरुपुष्यामृत योग ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा, मिळणार भरपूर यश!

महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप नेत्याने शिवसेनेचं टेंशन वाढवलं

रवी राणा लोकसभा निवडणुकीचा बदला विधानसभेला घेणार?

Join WhatsApp Group

Join Now