‘चीन’चा बदला घेण्यासाठी सलमान खान लडाखला जाणार!

On: May 10, 2025 11:03 AM
Salman Khan
---Advertisement---

Salman Khan | बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा देशभक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. यावेळी तो थेट लडाखच्या गलवान खोऱ्यात युद्धभूमीवर उतरतोय – अर्थात चित्रपटात! दिग्दर्शक अपूर्व लखिया यांचा आगामी युद्धपट भारत-चीन गलवान संघर्षावर आधारित असून, यात सलमान एका पराक्रमी भारतीय सैनिकाची भूमिका साकारणार आहे.

गलवान संघर्षावर आधारित कथानक :

२०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसक चकमकीने संपूर्ण देश हादरला होता. या संघर्षात भारतीय जवानांनी दिलेला बलिदान अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. हेच वीरतेचे दर्शन या चित्रपटात घडणार असून, ही एक सिनेमॅटिक श्रद्धांजली असणार आहे. (Salman Khan New Movie)

चित्रपटात सलमान खान देशासाठी लढणाऱ्या एका कणखर आणि प्रेरणादायक सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वीही ‘बजरंगी भाईजान’, ‘टायगर’ आणि ‘भारत’ सारख्या चित्रपटांतून त्याने देशभक्तीचे दर्शन घडवले आहे. मात्र, गलवान संघर्षावर आधारित हा चित्रपट त्याच्या अभिनय कारकिर्दीत एक वेगळी उंची ठरू शकतो.

Salman Khan | अपूर्व लखियाचं दिग्दर्शन :

‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ फेम दिग्दर्शक अपूर्व लखिया या प्रकल्पाचे दिग्दर्शन करत असून, वास्तववादी अॅक्शन आणि देशभक्तीपूर्ण कथानक या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणार आहे. गलवानसारख्या ठिकाणी शुटिंग करणे हे स्वतःतच एक आव्हान आहे. (Salman Khan)

चित्रपटाचे शुटिंग थेट गलवान खोरे आणि लडाखच्या सीमावर्ती भागांमध्ये होणार असून, यामुळे दृश्यांना अधिक वास्तववादी लुक मिळणार आहे. 2026 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानच्या चाहत्यांसह संपूर्ण देशासाठी हा चित्रपट एक भावनिक अनुभव ठरेल.

News Title: Salman Khan to Star in Film Based on Galwan Clash; Shooting to Begin in Ladakh Soon

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now