धक्कादायक! सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, बॉम्बने घर उडवण्याची धमकी!

On: April 14, 2025 10:52 AM
salman khan
---Advertisement---

Salman Khan l बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, यामुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ही धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर आली आहे. अज्ञात व्यक्तीने “सलमानच्या घरात घुसून त्याला बॉम्बने उडवू” असा मजकूर पाठवला आहे. (Salman Khan Receives Bomb Threat)

या प्रकारानंतर वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. वाहतूक विभागाचा व्हॉट्सॲप नंबर सार्वजनिक असल्याने अशा धमक्या येण्याची शक्यता अधिक असते, तरी या धमकीने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

आधी गोळीबार, आता पुन्हा धमकी :

सलमान खानला याआधीही अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. एप्रिल 2024 मध्ये ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता. तसेच, सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली असून, त्याने बुलेटप्रूफ गाडी आणि बुलेटप्रूफ बाल्कनीचीही व्यवस्था केली आहे.

‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीट शिकार प्रकरणामुळे सलमान बिष्णोई (bishnoi gang) समुदायाच्या रडारवर आहे. काळवीट हा बिष्णोई समाजासाठी पवित्र मानला जातो, त्यामुळे त्या घटनेनंतर सलमानविषयी त्यांच्या मनात तीव्र नाराजी आहे. त्याचा परिणाम म्हणून अशा धमक्या सतत समोर येत आहेत. (Salman Khan Receives Bomb Threat)

Salman Khan l ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त केली भूमिका :

नुकताच प्रदर्शित झालेला ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानला धमक्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने शांतपणे प्रतिक्रिया देताना सांगितलं, “भगवान, अल्लाह सब उनपर है, जितनी उमर लिखी है, उतनी लिखी है. कधी कधी इतक्या लोकांना सोबत घेऊन राहावं लागतं, बस हीच एक समस्या आहे.” (Salman Khan)

सलमानचा हा संयमी आणि शांत स्वभाव याआधीही अशा परिस्थितींमध्ये दिसून आला आहे. मात्र पोलिसांकडून त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात असून, पुढील काळात त्याच्या आसपासची सुरक्षा आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

News Title: Salman Khan Receives Bomb Threat via WhatsApp, Police File Case Against Unknown Sender

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now