Bigg Boss 19 | ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला रिअॅलिटी शो असल्याने, प्रत्येक सिझनमध्ये सलमान खान सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्यामुळे निर्मात्यांकडून त्याच्या मानधनात दरवर्षी भर पडत आहे. आगामी ‘बिग बॉस 19’ साठी तर सलमानच्या मानधनाची रक्कम ऐकून चाहते चकित झाले आहेत. (Big boss host salman khan salary)
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान यंदाच्या सिझनसाठी तब्बल 300 कोटी रुपये घेणार आहे. मागील सिझनमध्ये 250 कोटी रुपये मानधन घेतलेल्या सलमानने यंदा त्यामध्ये वाढ केली आहे. त्याचे शूटिंगचे दिवस वाढल्यामुळे त्याने फी वाढवली आहे, अशी माहिती समोर येते आहे. (Salman Khan Host Bigg Boss 19)
एका आठवड्यासाठी 13 कोटी रुपये? :
‘बिग बॉस’ हा शो दर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार आणि रविवार सलमान होस्ट करतो. त्यामुळे त्याच्या मानधनाचं आठवड्यानुसार विभाजन केलं असता, त्याला सुमारे 13 कोटी रुपये प्रती आठवडा दिले जात आहेत. सलग तीन-चार महिने चालणाऱ्या या शोसाठी सलमानच निर्मात्यांची पहिली पसंती असतो.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान या महिन्याच्या अखेरीस ‘बिग बॉस 19’ साठी प्रोमो शूट करणार आहे. शो जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीस प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
Bigg Boss 19 | स्पर्धकांची यादीही चर्चेत :
‘बिग बॉस’च्या प्रत्येक सिझनमध्ये स्पर्धकांची यादी चर्चेचा विषय असते. या सिझनमध्ये अपूर्वा मुखिजा, गौतमी कपूर, मून बॅनर्जी, अरिशफा खान, डेजी शाह, खुशी दुबे, मुनमुन दत्ता आणि मिस्टर फैजू यांसारख्या कलाकारांची नावे पुढे येत आहेत.
या कलाकारांसोबत सलमानचा सूत्रसंचालनाचा दमदार अंदाज प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. स्पर्धक निवड आणि त्यांच्या वागणुकीवरून सलमान अनेकदा चर्चेत असतोच. (Big boss host salary)








