फोनवर पतीसोबत बोलली, पळत रुममध्ये गेली, ओढणी घेतली अन्… , बापाचा आक्रोश

On: May 23, 2025 5:59 PM
Harassment
---Advertisement---

Prabhani News  | पुण्यातील (Pune) वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagawane) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे मुलीने आपले जीवन संपवले, अशी घटनुकतीच घडली असता आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  त्यानंतर आता परभणी (parbhani) जिल्ह्यातील झरी गावातून साक्षी लाटे या विवाहितेने सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपवले  आहे.

लग्नानंतर छळ सुरू :

साक्षी लाटेचा (Sakshi) विवाह (marriage) १२ डिसेंबर २०२२ रोजी गावातच चंद्रप्रकाश भिकुदास लाटे यांच्याशी झाला. लग्नानंतर केवळ चार-पाच दिवसांतच सासरच्या कुटुंबीयांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. सासू प्रमिला लाटे तिला “तुला स्वयंपाक येत नाही,” “तुला कोणतेही काम चांगले नाही,” असे म्हणत सतत शिवीगाळ करत होती. नवरा चंद्रप्रकाशही दारू पिऊन घरी आल्यावर मारहाण करायचा, तसेच तिला आई-वडिलांशी बोलू देत नव्हता.

सासरच्या त्रासामुळे साक्षी मागील दोन वर्षांपासून माहेरच्यांकडे राहत होती. पोलिसांनीही पती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले.  तिने पोलीस ठाण्यात पती-पत्नीच्या वाद मिटवण्यासाठी अर्ज केला होता. तरी सासरच्या लोकांनी तिला नांदवण्यास नकार दिला. गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांनीही साक्षीला सासरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला, पण सासरच्यांनी विरोध केला.

गळफास घेऊन संपवले जीवन

२१ मे सायंकाळी साक्षीने पतीसोबत फोनवर संवाद साधला. त्यानंतर तिने रुममध्ये जाऊन ओढणी फॅनला बांधून गळफास घेतला. तिला तात्काळ झरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले, पण उपचारादरम्यान ती मरण पावली.

साक्षीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती चंद्रप्रकाश लाटे, सासरे भिकुदास लाटे, सासू प्रमिला लाटे, भाया दैवत लाटे, जाऊ सुजाता लाटे व ननंद दयावंती यांच्यावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप आहे. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Title : Spoke to her husband on the phone, went straight to the room and… Sakshi ended her life

Join WhatsApp Group

Join Now