सैफ अली खानच्या घरातील ईदचे फोटो जोरदार सोशल मीडियावर व्हायरल

On: March 31, 2025 7:38 PM
saif ali khan
---Advertisement---

Kareena Kapoor | संपूर्ण देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत आपल्या परिवारासोबत या विशेष दिवसाचा आनंद लुटला आहे. अभिनेता नवाब सैफ अली खानने (Saif alikhan )देखील आपल्या कुटुंबासह ईद साजरी केली, आणि त्याच्या या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

कुटुंबासोबत सैफचा खास ईद सेलिब्रेशन

सैफ अली खानने यंदा ईदचा सण आपली पत्नी करीना कपूर खान (Kareena kapoor), बहीण सोहा अली खान आणि सबा अली खानसोबत साजरा केला आहे. सोहा अली खानने या खास क्षणांचे काही सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये संपूर्ण खान कुटुंब एकत्र येऊन ईदचा आनंद घेताना दिसत आहे.

करीना कपूरच्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

या सेलिब्रेशनमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते करीना कपूरच्या नो-मेकअप लूकने. तिचा साधा आणि मोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. पारंपरिक ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसतानाही तिचा सुंदर लूक चाहत्यांना भावला आहे.

शेवयांशिवाय ईद अपूर्णच!

सोहा अली खानने या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत एक खास कॅप्शन दिले, “शेवयांशिवाय ईद कशी पूर्ण होईल?” या फोटोंमध्ये तिने आणि तिच्या पती कुणाल खेमूने एकत्रितपणे तयार केलेल्या गोडश्या शेवयांची झलक देखील पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

सैफ अली खानच्या कुटुंबाने ईदचा हा खास सण अत्यंत आनंदात आणि प्रेमाने साजरा केला आहे. चाहत्यांनीही त्यांच्या या सोहळ्याचे फोटो पाहून शुभेच्छांचा वर्षाव केला. खान कुटुंबाच्या या उत्साहपूर्ण सेलिब्रेशनने चाहत्यांमध्येही उत्साह निर्माण केला आहे.

दरम्यान, सोहा अली खान लवकरच ‘छोरी 2’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री नुसरत भरुचाही दिसणार आहे.

Title : saif ali khan eid 2025 kareena kapoor look 

 

Join WhatsApp Group

Join Now