ब्रेकिंग! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

On: January 16, 2025 8:53 AM
Saif Ali Khan Attacked  
---Advertisement---

Saif Ali Khan Attacked | मनोरंजन क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार केले जात आहेत. (Saif Ali Khan Attacked)

सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

नेमकं घडलं काय?

मध्यरात्री अभिनेत्याच्या घरात काही चोर घुसले होते. रात्री अंदाजे 2 वाजता अभिनेत्यावर हा हल्ला करण्यात आला. चोराने चाकूने वार करत तिथून पळ काढला. या सर्व प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या वृत्तामुळे सैफ अली खानचे चाहते देखील चिंतेत पडले आहेत.

सैफ अली खानला नेमकी किती दुखापत झाली, त्याची प्रकृती सध्या ठीक आहे की नाही? याबाबत कोणताच खुलासा झालेला नाही. मात्र, या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Saif Ali Khan Attacked)

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलीस पथके देखील तयार करण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणाचा आता कसून तपास केला जातोय.

News Title : Saif Ali Khan Attacked  

महत्वाच्या बातम्या-

‘माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं’; वाल्मिक कराडच्या पत्नीचे गंभीर आरोप

दिवसाची सुरुवातच शुभवार्ताने होईल, आज स्वामी ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!

वाल्मीक कराड बद्दल कोर्टात 7 खळबळजनक दावे, एसआयटीच्या दाव्यांनी कोर्ट सुद्धा हादरलं

…तो एक पुरावा अन् वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी!

वाल्मिक कराड हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटे बोलला! सगळं सत्य आलं समोर

Join WhatsApp Group

Join Now