रुपाली पाटील ठोंबरे तिखट शब्दात कडाडल्या! म्हणाल्या…

On: November 11, 2025 3:44 PM
Rupali patil thombare
---Advertisement---

Rupali Patil Thombare | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पुन्हा एकदा अंतर्गत खळबळ माजली आहे. पक्षाचे प्रवक्ते रुपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit pawar) यांनी प्रवक्तेपदावरून वगळलं आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयानंतर रुपाली पाटील ठोंबरेंनी फेसबुक पोस्टद्वारे नाराजी व्यक्त करत थेट संघर्षाचा इशारा दिला आहे.

रुपाली ठोंबरेंना प्रवक्तेपदावरून हटवण्याचं कारण त्यांच्या वारंवार पक्षविरोधी विधानांमध्ये दडलेलं असल्याचं बोललं जातं. साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टरच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात त्यांनी राष्ट्रवादी नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याच कारणामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अजित पवारांची भेट घेऊन आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. पण, या भेटीनंतर काही तासांतच त्यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आलं.

रुपाली ठोंबरेंचा थेट इशारा – “ख्वाडा करणार!” :

प्रवक्तेपदावरून डच्चू मिळाल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी फेसबुकवर जाहीर पोस्ट करत पक्षातील व्यवस्थेवर थेट टीका केली आहे. “शेतकरीकन्या डॉ. संपदा मुंडे यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार. माझा आवाज दाबला जाईल का? प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. आपला इतिहास हा अन्याय सहन करणार्‍यांचा नाही, गरज पडली तर ‘ख्वाडा’ करणार्‍यांचा आहे,” अशा शब्दांत त्यांनी थेट संघर्षाची चेतावणी दिली.

त्यांच्या या पोस्टमुळे आता राष्ट्रवादीत अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ठोंबरेंनी आपल्याला हटवल्याच्या निर्णयावर अजूनही अंतिम प्रतिक्रिया देताना संयम दाखवला असला तरी, त्यांच्या भाषेतला आक्रमक सूर नव्या राजकीय संघर्षाची चाहूल देतो आहे.

Rupali Patil Thombare | सुरज चव्हाणांना पुन्हा संधी, चर्चेला उधाण :

दरम्यान, अजित पवार गटाने (Ajit pawar) प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत यापूर्वी मारहाण प्रकरणात वादात सापडलेले आणि पद गमावलेले सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.

रुपाली ठोंबरेंच्या हटवणुकीनंतर आणि सूरज चव्हाणांच्या पुनर्नियुक्तीनंतर पक्षाच्या आतल्या गोटात असंतोष वाढल्याचं बोललं जातं. ठोंबरेंनी संघर्षाचा इशारा दिल्यानंतर येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी अजित पवार गटात राजकीय समीकरणांमध्ये आणखी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. (Rupali Patil Thombare)

“मी पक्षाशी निष्ठावान, पण अन्यायाविरुद्ध लढणार” – ठोंबरे ” :

एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना ठोंबरेंनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षाशी निष्ठावान आहे, पण अन्यायाविरुद्ध गप्प बसणार नाही. महिलांवर, शेतकऱ्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मी पुन्हा आवाज उठवेन,” असं त्या म्हणाल्या. त्यामुळे त्यांनी आपला पुढील राजकीय प्रवास स्वबळावर सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

News Title: Rupali Patil Thombare Reacts Strongly After Being Removed as NCP Spokesperson; Warns of Political Battle Against Injustice

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now