पालकांसाठी महत्त्वाची बातमी! RTE प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

On: April 13, 2026 6:40 PM
Maharashtra Heatwave Alert
---Advertisement---

RTE Admission 2026 | पुणे शहरासह राज्यभरातील पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Right to Education Act 2009 (RTE) अंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड जाहीर झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून 20 एप्रिल ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.

या वर्षी एकूण 1,05,229 (सर्वसाधारण गट) आणि 582 (दिव्यांग गट) अशा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. राज्यभरातील 8,701 शाळांमधील 1,14,826 जागांसाठी तब्बल 2.89 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते.

आरटीई प्रवेश प्रक्रिया कशी करावी? :

– अधिकृत RTE पोर्टलवर जाऊन मुलाचे नाव निवड यादीत तपासा.
– नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या SMS ची खात्री करा.
– आवश्यक कागदपत्रांसह गटशिक्षणाधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे पडताळणी करा.
– पडताळणी समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर ऑनलाइन प्रमाणपत्र घ्या.
– संबंधित शाळेत जाऊन अंतिम प्रवेश निश्चित करा.

RTE Admission 2026 | प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठीही संधी :

या प्रक्रियेत निवड न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण गटातील 86,004 आणि दिव्यांग गटातील 30 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. अंतिम मुदतीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, 20 एप्रिलपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास निवड रद्द होऊ शकते आणि ती जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना दिली जाईल.

RTE अंतर्गत ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची मोठी संधी आहे. त्यामुळे पालकांनी कोणताही विलंब न करता तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Pune RTE Admission 2026 Deadline April 20: Over 1 Lakh Students Selected

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now