वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर रोहित शर्मा फिदा! केलं भरभरून कौतुक

On: April 29, 2025 11:17 AM
Vaibhav Surywanshi
---Advertisement---

Vaibhav Suryavanshi | राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात वैभवने वादळी शतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, वैभवने केवळ तिसऱ्या आयपीएल सामन्यातच हे शतक साकारत क्रिकेट विश्वाला थक्क करून सोडलं आहे.

रोहित शर्माची खास प्रतिक्रिया; एका शब्दात दिलं कौतुक :

फक्त ३५ चेंडूत शतक पूर्ण करत वैभवने यूसुफ पठाणचा विक्रम मोडीत काढला आणि आयपीएलमधील सर्वात वेगवान भारतीय शतक ठोकणारा फलंदाज ठरला. या कामगिरीनंतर वैभववर (Vaibhav Suryavanshi) सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वैभवच्या या अप्रतिम खेळीने राजस्थान रॉयल्सने २१० धावांचं लक्ष्य अवघ्या २५ चेंडू राखून पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालने नाबाद ७० धावा, तर रियान परागने नाबाद ३२ धावा केल्या. मात्र, वैभवचा तुफानी शतकामुळे तोच विजयाचा खरा हिरो ठरला.

Vaibhav Suryavanshi | वैभवच्या खेळीचं सोशल मीडियावरून भरभरून कौतुक :

टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही वैभवच्या खेळीचं सोशल मीडियावरून भरभरून कौतुक केलं. रोहितने आपल्या इंस्टा स्टोरीत वैभवचा फोटो पोस्ट करत ‘क्लास’ असा एक शब्द वापरून त्याच्या खेळीचं वर्णन केलं. वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराकडून मिळालेलं हे कौतुक वैभवसाठी मोठं प्रेरणादायी ठरलं आहे. (Vaibhav Suryavanshi)

News Title: Rohit Sharma Praises 14-Year-Old Vaibhav Suryavanshi’s Record-Breaking Century in IPL 2025

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now