‘बच्चा बडा हो गया’, सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं

On: June 4, 2024 5:29 PM
Rohit Pawar
---Advertisement---

Rohit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंंघातून नणंद विरूद्ध भावजय अशी लढत झाली. अनेकांचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. हा मतदारसंघ केवळ राज्य नाहीतर देशातील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ होता. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला अबाधित ठेवला असून चौथ्यांदा विजय मिळवला आहे. यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांना ट्विटच्या माध्यमातून डिवचलं आहे.

“बच्चा बडा हो गया”, रोहित पवार यांचं ट्विट चर्चेत

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अजित पवार यांच्याविरोधात एक ट्विट केलं आहे. त्यांनी त्या ट्विटच्या माध्यमातून अजित पवार यांना डिवचलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केलं असून त्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

“काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झाली!”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवारांकडून सुप्रिया सुळेंचं अभिनंदन

“बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!”, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. 

News Title – Rohit Pawar Slam To Ajit pawar After Supriya Sule Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

“बाप बाप होता है, आता देवेंद्र फडणवीसांना समजलं असेल”

उदयनराजे भोसलेंना रडू कोसळलं, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

कोल्हापूरमध्ये मान आणि मतही गादीलाच! शाहू महाराजांचा दणदणीत विजय

मोदींमुळेच भाजप खड्ड्यात गेला!, भाजप नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

मोठी बातमी! अमरावतीत नवनीत राणांचा पराभव

Join WhatsApp Group

Join Now