आरजे महवशने चहलसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाली “आपलं काम करत राहा…”

On: March 13, 2025 2:58 PM
rj mahvash
---Advertisement---

RJ Mahvash | प्रसिद्ध आरजे महवश (RJ Mahvash) सध्या चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्यासोबतच्या नात्याबद्दल पसरलेल्या अफवा. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांचे नाव एकत्र घेतले जात असून, नुकत्याच पार पडलेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये महवशला उपस्थित पाहून पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

महवश आणि चहलच्या नात्याच्या चर्चा-

महवश (RJ Mahvash) आणि चहलच्या नात्याबद्दलच्या अफवा याआधीही समोर आल्या होत्या. मागील वर्षी ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान महवशने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती चहल आणि त्यांच्या मित्रपरिवारासोबत दिसली होती. विशेष म्हणजे, या फोटोला तिने “Family” असे कॅप्शन दिले होते, ज्यामुळे चर्चांना अधिक जोर मिळाला.

RJ Mahvash Post

चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यातील दुराव्याच्या चर्चांदरम्यान महवशचे नाव पुढे येऊ लागले. त्यामुळेच सोशल मीडियावर अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की महवशच ती “गूढ स्त्री” आहे, जी चहलसोबत जोडली जात आहे.

महवशने दिला सूचक संदेश-

या चर्चांना अधिक तोंड फुटू नये म्हणून महवशने (RJ Mahvash) आपल्या इंस्टाग्रामवर एक सूचक पोस्ट शेअर केली. एका पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट मेगा इन्फ्लुएंसर’चा किताब जिंकल्यानंतर तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “लहान महवशला आजच्या महवशचा अभिमान वाटतो आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे! आपलं काम करत राहा, ना चुकीचं करा ना चुकीचं ऐका.” तिच्या या पोस्टमधून अफवांकडे दुर्लक्ष करण्याचा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिल्याचे दिसून आले.

दरम्यान, महवशच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होत आहे. जानेवारी २०२५ मध्ये तिचे १.५ दशलक्ष फॉलोअर्स होते, तर अवघ्या काही महिन्यांतच हे संख्याशास्त्र २.१ दशलक्षपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच तब्बल ६ लाख नवीन फॉलोअर्स वाढले आहेत. हे तिच्या यशामुळे असू शकते, पण काहीजण याला चहलसोबतच्या चर्चांशी जोडत आहेत.

News Title : RJ Mahvash Reacts to Dating Rumors with Yuzvendra Chahal

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now