चमकदार त्वचेसाठी करा ‘हा’ उपाय, मुरुम, डाग होतील गायब

On: February 12, 2025 3:29 PM
Remedies for Acne and Bright Skin
---Advertisement---

Remedies for Acne | चमकदार त्वचा मिळवण्यासाठी काय उपाय करायला हवेत, याचे उत्तर या लेखात देण्यात आले आहे. या उपायांमुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळवण्यास मदत होईल. (Remedies for Acne)

तुरटी आणि ग्लिसरीन टोनर

तुम्ही ग्लिसरीनमध्ये (Glycerin) तुरटी मिसळून टोनर म्हणून वापरू शकता. यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात तुरटीची पूड आणि काही तुळशीची पाने टाका. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत (Spray Bottle) भरा.

तुरटी आणि गुलाबपाणी

तुम्ही गुलाबपाण्यात तुरटी मिसळून लावू शकता. यासाठी तुरटीची पूड तयार करा. एक चमचा तुरटी पूड घेऊन त्यात गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. हलक्या हाताने गोलाकार मसाज (Circular Motion) करा. 10-15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. (Remedies for Acne)

मुरुमांसाठी उपाय

तुरटीची पूड पाण्यात मिसळा. हे द्रावण आंघोळीच्या पाण्यात टाका. या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावरील मुरुम कमी होतात. चेहऱ्यावर पुरळ असल्यास, ओल्या चेहऱ्यावर तुरटीने काही वेळ मसाज करा.

चेहरा उजळवण्यासाठी

चेहरा उजळवण्यासाठी मुलतानी माती आणि चंदन पावडरमध्ये (Sandalwood Powder) तुरटीची पूड मिसळा. त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर (Moisturizer) लावा.

डाग काढण्यासाठी

चेहरा स्वच्छ करण्यासाठी, एका भांड्यात तुरटीची पूड घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) मिसळा. या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा. असे केल्याने मुरुमांचे डाग कमी होतील. (Remedies for Acne)

Title : Remedies for Acne and Bright Skin

 

Join WhatsApp Group

Join Now