Rekha | हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यासाठी आणि दिलखेचक अदांसाठीही ओळखल्या जातात. याच कारणामुळे 69 वर्षांच्या असतानाही लोक रेखाच्या सौंदर्यावर फिदा आहेत. रेखा यांच्या पुरुष चाहत्यांची संख्याही भक्कम आहे.
रेखा यांचे खासगी आयुष्य
रेखा आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहे. रेखा यांनी दिल्लीच्या एका प्रसिद्ध व्यावसायिकाशी लग्न केले होते, परंतु त्यांचे नाव अनेक पुरुषांशी जोडले गेले. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या रेखाच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली होती.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे अफेअर
रेखा किंवा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अफेअरबद्दल कधीही जाहीरपणे भाष्य केले नाही. रेखाने दिल्लीच्या एका व्यावसायिकाशी प्रेमविवाह केला होता, पण हे लग्न दुर्दैवी ठरले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखाला सर्वात आधी तिचा सहकलाकार अमिताभ बच्चनसोबत प्रेम झाले होते. असे म्हटले जाते की रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची सुरुवात 1976 मध्ये झाली. त्यावेळी दोघे ‘दो अनजाने’ चित्रपटात काम करत होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले. मात्र, अमिताभ बच्चन त्यावेळी विवाहित होते. अशा परिस्थितीत रेखा आणि बिग बी यांच्यात कोणतेही नातेसंबंध निर्माण होऊ शकले नाहीत. (Rekha)
रेखा आणि विनोद मेहरा यांचे गुप्त लग्न
यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकानुसार, अभिनेत्रीने हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी लग्न केले होते. पुस्तकानुसार, कोलकात्यात लग्न केल्यानंतर रेखा जेव्हा तिचा पती विनोद मेहरा यांच्या घरी पोहोचली तेव्हा अभिनेत्याची आई कमला मेहरा यांनी रागाच्या भरात अभिनेत्रीला मारण्यासाठी चप्पल काढली होती. (Rekha)
पुस्तकातील माहितीनुसार, रेखा जेव्हा सासू कमला मेहरा यांच्या पाया पडू लागली तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला धक्का देऊन दूर ढकलले. रेखा घराच्या दारात उभी होती आणि तिची सासू तिला शिव्या देत होती.
मात्र, नंतर विनोद मेहरा यांनी मध्यस्थी करून आईला समजावले. नंतर विनोद मेहरा यांनी रेखाला तिच्या घरी परत जाण्यास आणि सध्या तिथेच राहण्यास सांगितले. काही काळानंतर कौटुंबिक कारणांमुळे हे लग्न तुटले.
रेखा आणि व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांचे लग्न
यानंतर रेखा यांनी 4 मार्च 1990 रोजी दिल्लीचे व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. परंतु लग्नाच्या 7 महिन्यांनंतरच पतीने आत्महत्या केली.
यासिर उस्मान यांच्या ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात असे म्हटले आहे की रेखाने लग्नाच्या काही दिवसांनंतरच पती मुकेश अग्रवालपासून दुरावा निर्माण केला होता. त्यानंतर अचानक ऑक्टोबर 1990 मध्ये रेखाचा पती मुकेश अग्रवाल याने आत्महत्या केली. मुकेश अग्रवाल दिल्लीचे मोठे व्यावसायिक होते. त्यांची कंपनी हॉटलाइन स्वयंपाकघरातील भांडी बनवत असे.
रेखाच्या प्रेमात वेडा झालेला संजय दत्त
ड्रग्जचे व्यसन आणि खासगी आयुष्यातील गोंधळामुळे त्रस्त असलेला संजय दत्तची चित्रपट कारकीर्द एका वेळी उद्ध्वस्त होऊ लागली होती. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. त्याच वेळी काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने संजय दत्तला या वाईट टप्प्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी घेतली होती. (Rekha)
1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमीन आसमान’ चित्रपटात रेखा आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते आणि येथूनच त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. असे म्हटले जाते की या काळात संजय दत्त ड्रग्सच्या आहारी जाऊ लागला होता.
संजय दत्तची आई नर्गिस दत्त अभिनेत्री रेखाचे नाव ऐकताच संतापायची. जेव्हा संजय दत्तची आई अभिनेत्री नर्गिस दत्तला या अफेअरबद्दल कळले तेव्हा तिने रेखाला खूप काही सुनावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नर्गिस दत्तने एके दिवशी रेखाला शूटिंगच्या सेटवरच खूप काही ऐकवले होते.
रेखा आणि संजय दत्त यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे अभिनेत्याची आई नर्गिस दत्त खूपच त्रस्त झाली होती. वृत्तानुसार, नर्गिसने रेखाच्या चारित्र्यावरही अनेक प्रकारचे आरोप केले होते. मात्र, संजय दत्त आणि रेखाने या नात्याबद्दल कधीही खुलासा केला नाही.
Title : Rekha Tumultuous Life A Tragic Marriage and Many Affairs






