Hindu Mythology | लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी हिच्या १४ पुत्रांपैकी सर्वात धाकटा पुत्र म्हणजे दु:सह. दु:सहाचा जन्म होताच तो भूक-तहानेने व्याकूळ, अंगावर फाटके चिंध्यांचे कपडे लपेटलेला, मान खाली घातलेला असा दुःखी अवस्थेत सृष्टीचे पितामह ब्रह्माजींकडे गेला. (Hindu Mythology )
दु:सह ब्रह्माजींना म्हणाला, “मला राहण्यासाठी एखादे घर आणि भक्षण द्या, नाहीतर मी संपूर्ण जगाचा नाश करेन.” तेव्हा ब्रह्माजींनी दु:सहाला मनुष्यांच्या घरात राहण्याची परवानगी दिली आणि सांगितले की, “ज्या घरात तू निवास करशील, तिथे कायमची दरिद्रता नांदेल. ज्या घरात माझ्या नियमांचे पालन होणार नाही तेच तुझे कायमचे घर असेल.” ब्रह्माजींनी दु:सहाला अनेक कारणे सांगितली ज्यामुळे तो लोकांच्या घरात राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या घरांमध्ये दरिद्रतेचा वास असतो.
‘या’ कारणांमुळे घरात येते दरिद्रता
ज्या घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी भांडणे आणि कलह होतात, तिथे दरिद्रता कायमची राहते. तसेच, ज्या घरात पाहुणे, आई-वडील आणि जावयाचा आदर केला जात नाही, तिथे दु:सह राहू लागतो.
ज्या घरांमध्ये वाढलेल्या अन्नाची निंदा केली जाते किंवा ते अन्न फेकून दिले जाते, अशा घरांमध्ये दरिद्रता वास करू लागते. तुटक्या-फुटलेल्या भांड्यांमध्ये जेवणारे, ज्या अन्नावर कुत्र्याची नजर पडली आहे ते खाणारे, आजूबाजूला बसलेल्यांना न विचारता जेवणारे लोक नेहमीच दारिद्र्याचा बळी ठरतात. (Hindu Mythology )
अन्न आणि स्त्रियांचा अनादर ठरेल घातक
कच्च्या किंवा शिजवलेल्या अन्नाचा कोणत्याही प्रकारे अपमान करणारा मनुष्य दरिद्रतेला स्वतःकडे आमंत्रित करतो. ज्या घराबाहेर गाय, म्हैस, घोडा, गाढव न खाता-पिता बांधलेले असतात, तिथेही दरिद्रता येते.
ज्या घरात स्त्रिया आनंदी नसतात तिथे दरिद्रता कायमची राहते. जो मनुष्य धर्माचे पालन करत नाही आणि सदाचारापासून दूर राहतो, नित्यकर्म करणे सोडून देतो, त्याच्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि तिथे कायमची दरिद्रता येते. (Hindu Mythology )
Title : Reasons For Poverty According To Hindu Mythology






