‘सैराट’ याड लावणार, आर्ची-परश्याची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर

On: March 11, 2025 7:43 AM
Re-release of  Sairat on March 21
---Advertisement---

Sairat | मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक यश मिळवलेल्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट 9 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओ मराठीने अधिकृत घोषणा करत 21 मार्च 2025 पासून ‘सैराट’ सिनेमागृहांमध्ये री-रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे.

2016  मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ने मराठी चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व यश संपादन केले होते. या चित्रपटाने 110 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडीत काढले. विशेषतः ‘झिंगाट’सारखी गाणी आजही लग्नसोहळे आणि पार्ट्यांमध्ये तितकीच लोकप्रिय आहेत. अजय-अतुल (Ajay-Atul) यांच्या संगीताने आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाने हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवर नेला.

21 मार्चपासून पुन्हा थिएटरमध्ये

‘सैराट’ची (Sairat) कथा ऑनर किलिंगसारख्या महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यावर भाष्य करणारी आहे. परश्या आणि आर्ची यांच्या प्रेमकथेने प्रेक्षकांना भावूक केले होते.

2016 मध्ये या चित्रपटाने इतकी लोकप्रियता मिळवली होती की, अनेक ठिकाणी मध्यरात्रीचे शोदेखील ठेवण्यात आले होते. मात्र, काही प्रेक्षकांना त्यावेळी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची संधी मिळाली नव्हती. आता मात्र, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

झी स्टुडिओ मराठीने अधिकृत घोषणा करत सांगितले की, “9 वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार पिरतीचं वारं! सैराटची जादू पुन्हा अनुभवा, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात २१ मार्चपासून.”

Title : Re-release of  Sairat on March 21

 

Join WhatsApp Group

Join Now