वाहनधारकांनो सावधान! अजूनही HSRP नंबर प्लेट बसवली नाही? तर मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच!

On: August 14, 2026 6:06 PM
HSRP Number Plate
---Advertisement---

HSRP Number Plate | हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा मुदतवाढ देऊनही राज्यातील मोठ्या संख्येने वाहनांवर अद्याप HSRP बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहन विभागाने आता तपासणी आणि कारवाईसाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. जुन्या किंवा नियमबाह्य नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर या मोहिमेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

HSRP नसलेल्या वाहनांवर विशेष पथकांची नजर :

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 84 हजार वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 98 लाख 08 हजार वाहनांवर प्रत्यक्षात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे.

मात्र, नोंदणी न केलेली किंवा अद्याप प्लेट न बसवलेली वाहनांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने आता अधिक कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

HSRP Number Plate | वाहनधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता :

ज्या वाहनांवर जुन्या पद्धतीच्या किंवा अधिकृत मानकांची पूर्तता न करणाऱ्या नंबर प्लेट्स वापरल्या जात आहेत, त्यांची रस्त्यावर तपासणी केली जाणार आहे. यासाठी परिवहन विभागाने विशेष पथके तयार केली असून राज्यातील विविध भागांत वाहनांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विशेषतः HSRP नसलेल्या वाहनांवर या पथकांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे अद्याप नंबर प्लेट बदललेली नसलेल्या वाहनधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

News title : HSRP Plate Checks Intensify Across Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now