चेंगराचेंगरी भोवली! RCB च्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याला अटक

On: June 6, 2025 9:33 AM
RCB Stampede Arrest
---Advertisement---

RCB Stampede Arrest | बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ निष्पाप क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या विजय सोहळ्यादरम्यान घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत, पोलिसांनी थेट संघाच्या मार्केटिंग हेड निखिल सोसले याला एअरपोर्टवरून अटक केली आहे. (RCB Stampede)

पोलिसांच्या माहितीनुसार, निखिल मुंबईला पळण्याच्या तयारीत असताना त्याला विमानतळावर अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याची भूमिका किती गंभीर होती, याचा तपास सुरू आहे. याशिवाय डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स या इव्हेंट आयोजक संस्थेचे तिघे कर्मचारीही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

एफआयआरमध्ये RCB, KSCA, DNA एंटरटेनमेंटचा समावेश :

बंगळुरुच्या कब्बन पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये RCB संघ, डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) आणि काही अज्ञात व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये डीएनएचे तीन स्टाफ मेंबर्स – किरण, सुमंथ आणि सुनील मॅथ्यू यांचाही समावेश आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू असून, क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी शेषाद्रिपुरमचे एसीपी प्रकाश यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

RCB Stampede Arrest | मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी घेतली तातडीची दखल :

ही घटना घडल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी तातडीने दखल घेतली होती. त्यांनी सुरुवातीला पोलिसांना जबाबदार धरले आणि काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. परंतु आता आयोजकांकडूनही चुकी झाली असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. (RCB Stampede)

कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्या नियमांकडे दुर्लक्ष झाले? कोणाची परवानगी घेण्यात आली होती? सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन होते का? या सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू आहे. अटक ही या प्रकरणातील पहिली मोठी कारवाई असून, लवकरच आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

News Title: RCB Official Arrested at Airport in Bengaluru Stampede Case That Killed 11 Cricket Fans

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now