RBI Rule Change | गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर RBI च्या नव्या नियमांमुळे तुमचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने फ्लोटिंग-रेट कर्जावरील नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला असून आता क्रेडिट स्कोअर सुधारताच त्वरित कमी व्याजदराचा लाभ ग्राहकांना मिळू शकणार आहे. यापूर्वी बँका स्प्रेड रिव्ह्यू करण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी घेत असत, पण हा लॉक-इन कालावधी RBI ने रद्द केला आहे. (RBI Rule Change)
या बदलामुळे गृहकर्जदारांना (Home Loan Interest Cut) व्याजदरात लगेचच सवलत मिळणार असून कर्जाचा एकूण भार कमी होणार आहे. ज्यांचे गृहकर्ज 50 ते 60 लाखांच्या दरम्यान आहे, अशा ग्राहकांना विशेष फायदा होणार आहे. अगदी 0.25% व्याजदराची कपातही महिन्याला हजारो रुपयांची बचत करू शकते.
स्प्रेडमध्ये त्वरित कपात – लाभ कसा मिळेल? :
गृहकर्जाचा व्याजदर साधारण दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे RBI रेपो रेट किंवा T-Bill यील्डसारखा बेंचमार्क, आणि दुसरा म्हणजे बँकेचा स्प्रेड. स्प्रेड हा तुमच्या क्रेडिट रिस्कनुसार बँक ठरवते. आता क्रेडिट स्कोअर वाढल्यास हा स्प्रेड कमी करण्याची संधी बँक ग्राहकांना तात्काळ देणार आहे.
ग्राहकाने सर्वप्रथम आपला क्रेडिट स्कोअर तपासावा. कर्ज घेतल्यानंतर तुमचा स्कोअर अधिक सुधारला असेल, तर तुम्ही लगेच बँकेकडे अर्ज करून व्याजदरात कपात करण्याची मागणी करू शकता. बँक तुमची फाईल तपासून स्प्रेड कमी करेल किंवा कर्जाचा कालावधी कमी करेल – दोन्हीप्रकारे तुमचा आर्थिक फायदा निश्चित आहे.
RBI Rule Change | जुन्या-नव्या ग्राहकांना समान संधी :
आतापर्यंत नवीन ग्राहकांना लगेचच कमी व्याजदराचा लाभ मिळत असे, पण जुन्या ग्राहकांना तीन वर्षांच्या स्प्रेड रिव्ह्यूची प्रतिक्षा करावी लागत होती. RBI च्या नव्या नियमामुळे आता सर्व ग्राहकांना समान संधी मिळाली आहे. क्रेडिट स्कोअर सुधारताच व्याजदराचा फायदा मिळणार असल्याने ग्राहकाच्या EMI वर थेट परिणाम होईल. (Home Loan Interest Cut)
दीर्घकालीन गृहकर्जामध्ये व्याजदरातील छोटी कपातही मोठ्या बचतीचे कारण ठरते. त्या बचतीची रक्कम म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणुकीत टाकल्यास काही वर्षांनी मोठे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे RBI चा हा निर्णय गृहकर्जदारांसाठी मोठा दिलासा देणारा ठरत आहे.






