रश्मिका मंदानाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; केलं प्रचंड ट्रोल

On: April 7, 2025 1:13 PM
Rashmika Mandanna
---Advertisement---

Rashmika Mandanna l साऊथ आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या केंद्रस्थानी आली आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिने स्वतःसाठी खास व्हिडीओ बनवला आणि शेअर केला. पण या व्हिडीओत रश्मिकाचं लहान मुलांसारखं वागणं चाहत्यांना फारसं रुचलं नाही.

‘ओवर एक्टिंग की दुकान’, ‘इरिटेटिंग’, ‘अभिनय शिक आधी’ अशा प्रकारच्या कमेंट्ससह अनेक युजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. काहींनी तिला डोंगराएवढं ओव्हर रिऍक्टिंग करत असल्याची टीका केली आहे.

वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :

रश्मिकाने तिच्या 29 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सोशल मीडियावर शेअर केलं. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती “हॅपी बर्थडे टू राशी” म्हणत स्वतःसाठी गाणं गात होती आणि नाचत होती. ती ब्लू प्रिंटेड ड्रेसमध्ये समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटताना दिसली.

मात्र या व्हिडीओतील तिचं वागणं प्रेक्षकांना खटकलं. अनेकांनी तिला “बाळासारखं वागणं बंद कर” असा सल्ला दिला आहे. तिच्या हावभावांवरून आणि वर्तनावरून सोशल मीडियावर मीम्सला सुरुवात झाली आहे.

Rashmika Mandanna l विजय देवरकोंडासोबतच साजरा केला वाढदिवस? :

रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र जोडलं जात आहे. यावेळीही चाहत्यांनी असा अंदाज बांधला की तिने वाढदिवस विजयसोबतच साजरा केला. रश्मिकाच्या पोस्टमधील बॅकग्राऊंड आणि विजयच्या इंस्टाग्रामवरच्या लोकेशनमधील साम्य पाहून अनेकांनी अंदाज लावला आहे.

तिने भलेही कोणाचं नाव घेतलं नसलं तरी काही युजर्सनी कमेंटमध्ये विचारलं, “हा व्हिडीओ कोणी शूट केला?” आणि काहींनी थेट सांगितलं, “नक्की विजयच असेल.”.

News Title: Rashmika Mandanna Trolled for “Overacting” in Birthday Video, Fans Call Her Irritating

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now