आलिया भट्ट रणबीरची दुसरी बायको?, पहिल्या पत्नीबाबत धक्कादायक खुलासा समोर

On: March 22, 2025 8:40 AM
Ranbir Kapoor Calls Alia His Second Wife
---Advertisement---

Ranbir Kapoor | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असा एक खुलासा केला आहे की, त्याने अनेकांना चकित केलं. रणबीरने पत्नी आलिया भट्टला (Alia Bhatt) ‘दुसरी बायको’ म्हणत एक मजेशीर परंतु धक्कादायक किस्सा शेअर केला.

रणबीरने सांगितलेली पहिली ‘पत्नी’ कोण?

रणबीर कपूर आपल्या बोलण्यामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतो. एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील एक मजेशीर प्रसंग सांगितला. रणबीर म्हणाला, “जेव्हा मी करिअरला सुरुवात करत होतो, तेव्हा एक मुलगी पंडितासोबत माझ्या घराबाहेर आली होती. त्यांच्याकडे लग्नासाठी लागणारी सर्व सामग्री होती. माझ्या अनुपस्थितीत तिने घराबाहेरच माझ्यासोबत लग्न केलं.”

रणबीर पुढे सांगतो, “मी घरी नव्हतो. नंतर घरी आल्यानंतर गार्डने मला सर्व प्रकार सांगितला. गेटवर कुंकू लागलेलं होतं, आणि फुलं विखुरलेली होती. त्यामुळे technically, ती मुलगीच माझी ‘पहिली पत्नी’ झाली. मी अजूनही तिला भेटलो नाही, पण कधी भेटण्याची इच्छा आहे.” यामुळेच रणबीरने आलिया भट्टला ‘दुसरी पत्नी’ म्हटलं आहे.

आलिया-रणबीरचं नातं

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 2022 मध्ये त्यांच्या घरी, अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या आयुष्यात कायमची साथ दिली. विवाहानंतर काही महिन्यांतच आलियाने मुलीला जन्म दिला. तिचं नाव ‘राहा कपूर’ असं ठेवण्यात आलं आहे. रणबीर-आलिया सध्या त्यांच्या कन्येसोबत आनंदी कुटुंबजीवन जगत आहेत.

सोशल मीडियावरही या जोडीचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत असतात. चाहत्यांसाठी ही जोडी कपल गोल्स ठरते. परंतु रणबीरच्या या जुन्या मजेशीर प्रसंगामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.

Title : Ranbir Kapoor Calls Alia His Second Wife

 

Join WhatsApp Group

Join Now