विराट कोहलीचा आनंद गगनात मावेना; मैदानावर लहान मुलासारखा पळत सुटला अन् रवी शास्त्रींना…

On: June 4, 2025 12:20 PM
Virat Kohli Celebration
---Advertisement---

Virat Kohli Celebration | आयपीएल (IPL) २०२५ चा थरारक हंगाम अखेर संपला आहे. मंगळवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) इतिहास घडवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पंजाब किंग्सला ६ धावांनी हरवून आरसीबीने अंतिम सामना जिंकला आणि आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवले.

विराट कोहली चक्क मैदानात रडू लागला :

गेल्या १८ वर्षांपासून सतत आरसीबीसोबत असलेल्या आणि अनेक पराभव व निराशा पचवलेल्या विराट कोहलीसाठी कालचा विजय खूपच खास होता, कारण विराट कोहलीने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या १७ हंगामांमध्ये आरसीबीचा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु प्रत्येक वेळी यशाने त्यांना हुलकावणी दिली आणि आयपीएलचा चषक दुसऱ्याच संघाने जिंकला होता. (Virat Kohli Celebration)

मात्र, कालचा दिवस खऱ्या अर्थाने आरसीबीचा होता. सामना जिंकताच विराट कोहली चक्क मैदानात बसूनच रडू लागला. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. इतर खेळाडूंनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला, आणि विराटही थोड्या वेळाने त्यांच्यात सामील झाला. सामन्यानंतरच्या सेलिब्रेशनमध्ये विराटचा एक अनोखा आणि मनमोहक अंदाज दिसला.

पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारून रडतानाचे त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण त्याहूनही अधिक खास असलेला त्याचा रवी शास्त्री यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल.

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचा अनोखा क्षण :

रवी शास्त्री हे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. विराटच्या कर्णधारपदाच्या काळात रवी शास्त्री बराच काळ टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते, त्यामुळे त्यांच्यात एक खास नाते आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेले रवी शास्त्री हे काल आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत होते. सामन्याचा निकाल लागला, आरसीबी जिंकली, त्यानंतर मैदानात विराटने रवी शास्त्रींना पाहिले आणि तो जणू अगदी लहान मुलगाच झाला. दूर उभ्या असलेल्या रवी शास्त्रींना पाहून विराट एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत त्यांच्या दिशेने गेला आणि उडी मारत रवी शास्त्रींना चक्क ‘जादू की झप्पी’ दिली. हा क्षण अतिशय भावनिक आणि अविस्मरणीय होता, जो दोघांमधील दृढ संबंध दर्शवतो.

News Title: Ran Like a Little Kid and Gave a Magical Hug… You Haven’t Seen This Side of Virat Before! Video Goes Viral

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now