Ramraje Naik-Nimbalkar | नागपूरमधील आयकर विभागाने संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानासह गोविंद दूध संघावर छापा टाकला आणि तब्बल 120 तास चौकशी केली. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून एक इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांचा इशारा माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांना असल्याचे बोलले जात आहे.
छापेमारी आणि राजकीय चर्चांना उधाण
5 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता आयकर विभागाने फलटण, पुणे येथील संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानासह गोविंद दूध संघावर छापा टाकला. चौकशी रविवारी रात्री संपली, यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी “सुरूवात तुम्ही केली, शेवट मी करणारच…” असं व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट करत इशारा दिलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या नंतर, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अजित पवार यांना आपली साथ दिली. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका झाली. (Ramraje Naik-Nimbalkar)
रामराजे यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पराभूत करण्यासाठी पडद्याआड हलचाली केल्या, ज्यामुळे रणजितसिंह यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी दीपक चव्हाण यांना निवडणुकीसाठी मदत केली, ज्यामुळे अजित पवार नाराज झाले होते.
रामराजे नाईक-निंबाळकर आणि आगामी राजकीय संघर्ष
रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे भाजपच्या गटात असून, त्यांची भूमिका राज्यातील सत्तासंघर्षांमध्ये महत्त्वाची ठरू शकते. अशात व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून दिलेले इशारे यामुळे नवीन राजकीय संघर्ष निर्माण होण्याची नाकारता येत नाही.
Title: Ramraje Naik-Nimbalkar WhatsApp Status Sparks Political Debate






