अजित पवार गटाचा ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार!

On: October 5, 2024 3:28 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचा एक बडा नेता शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

अजित पवारांचा ज्येष्ठ नेता तुतारी हाती घेणार :

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांनी राज्यभर आपली ताकद दाखवून द्यायला सुरवात केली आहे. कारण महायुतीचे अनेक बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.

अशातच आता रामराजे नाईक निंबाळकर देखील शरद पवार प्रवेश करण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. तसेच यासंदर्भात आजच रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल रात्री फलटण येथील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे.

Sharad Pawar l अजित पवारांना दुहेरी धक्का बसणार? :

रामराजे नाईक निंबाळकर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती दिली आहे. तसेच रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडली तर हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का असणार आहे.

News Title – Ramraje naik nimbalkar join to sharad pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

दुःखद बातमी! ठाकरेंच्या झुंझार नेत्याचं निधन

आरक्षणाबाबत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कॉँग्रेस 50 टक्के..”

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 5 लाखात ही भन्नाट कार!

छोटा पुढारी झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये! ‘या’ बड्या नेत्याच्या बायोपिकमध्ये दिसणार

बोपदेव घाट गँगरेप प्रकरणी हादरवणारा खुलासा समोर; पीडितेला खुनाची धमकी दिली अन्…

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now