महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी!

On: July 10, 2026 4:14 PM
Ramesh Mhatre
---Advertisement---

Ramesh Mhatre | डोंबिवली (Dombivli) येथील महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींना 13 जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण न्यायालयात सुनावणी पार :

या प्रकरणाची सुनावणी कल्याण (Kalyan) सत्र न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्ट हॉल क्रमांक 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग तथा सरन्यायाधीश के. एस. कातकडे (K. S. Katkade) यांच्या दालनात या प्रकरणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला.

सुनावणीवेळी आरोपींच्या बाजूने ॲड. आनंद पथकी (Anand Pathki) यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षाकडून ॲड. आनंद आढसकर (Anand Adhaskar) यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचे म्हणणे आणि तपासाशी संबंधित बाबी न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज असल्याचे मान्य करण्यात आले.

Ramesh Mhatre | 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी :

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचा आदेश दिला. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आता आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे.

महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या आरोपामुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पोलीस कोठडीदरम्यान तपास यंत्रणा आरोपींची अधिक चौकशी करणार असून या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Ramesh Mhatre Sent to Custody

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now