Loksabha Result l राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक उलाढाली झाल्याचे दिसत आहे. अशातच कोल्हापूरच्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाला आहे.
राजू शेट्टींची फेसबुक होतेय व्हायरल :
हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टीचा दारुण पराभव झाला आहे. या
पराभवानंतर राजू शेट्टी यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. अशातच आता या फेसबुक पोस्टची सर्वत्र चर्चेत रंगली आहे.
या फेसबुक पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी जनेतला प्रश्न विचारला आहे. माझं काय चुकलं. प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. अशातच आता राजू शेट्टी शेतकऱ्यांवर देखील नाराज असल्याचं दिसत आहे. पोस्टदरम्यान ते म्हणाले की, शेतकऱ्यांनो तुम्हीही…. असंही ते म्हणाले आहेत .
https://www.facebook.com/share/p/tbDvCswRt36cN8tV/?mibextid=oFDknk
Loksabha Result l राजू शेट्टींना सर्वात मोठा धक्का :
हातकणंगलेमधील पराभवामुळे राजू शेट्टींना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण राजू शेट्टींना विजयाची अपेक्षा होती, पण मतदारांनी व शेतकऱ्यांनी त्यांना नाकारलं असल्याचं दिसून येत आहे. हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांचा दणदणीत विजय झाला आहे. मात्र धैर्यशील माने यांचं मताधिक्य जास्त राहिलेलं नाही.
राजू शेट्टींना तब्बल 13 हजार 426 मतं मिळाली आहेत. राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत 1 लाख 79 हजार 850 मतं मिळाली आहेत. वंचितच्या उमेदवाराने मत विभाजनाचं काम केलं आहे. वंचितच्या उमेदवाराला 32 हजार 696 मतं मिळाली आहेत.
News Title : Raju Shetty Facebook Viral Post
महत्त्वाच्या बातम्या-
संविधान वाचवण्यासाठी ‘या’ नेत्यांनी एकत्रित यावे; बड्या नेत्याचं विधान
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी
महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष कोणता?
या राशीच्या व्यक्तींना पराभवातून सावरावे लागेल
बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी






