MI vs RCB l आयपीएल 2025 चा महासंग्राम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सोशल मीडियावरील जुंप चर्चेचा विषय ठरली आहे. रजत पाटीदारच्या एका व्हिडीओ क्लिपमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, सोशल मीडियावर दोन्ही संघांचे समर्थक आमनेसामने येत आहेत.
RCB ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका मजेशीर व्हिडीओमध्ये मिस्टर नॅग्स आणि संघाचा नवीन कर्णधार रजत पाटीदार यांच्यातील संवाद चांगलाच गाजतोय. विशेष म्हणजे, या व्हिडीओतून मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलाच्या निर्णयाची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवण्यात आली आहे.
“MI” म्हणजे “मला माहित नाही”? – व्हिडीओचा भन्नाट ट्विस्ट :
गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिले, ज्यामुळे संघात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर मिस्टर नॅग्सने रजत पाटीदारला प्रश्न विचारला की, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी तुला कर्णधारपद मिळाल्यावर शुभेच्छा दिल्या, मग इतर संघांनीही तसं करायला नको का?
रजत पाटीदार या प्रश्नावर थोडं संकोचलेला दिसला, पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. मिस्टर नॅग्सने लगेचच “तू एमआय (MI) म्हणाला म्हणजे ‘मला माहित नाही’ असं म्हणायचंय ना?” असं विचारताच, साऱ्या प्रेक्षकांनी या संदर्भाचा अर्थ सहज ओळखला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा भडिमार सुरू झाला.
RCB is leading by 1-0 over Mumbai Indians this season even before the start of the season! ???? #IPL2025 pic.twitter.com/uRSrzdqKes
— Prathamesh Avachare (@onlyprathamesh) March 21, 2025
MI vs RCB l मुंबई इंडियन्सचे चाहते भडकले, सामन्यावर लक्ष :
RCB चा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले आहेत. काहींनी याला दुसऱ्या संघावर टीका करण्याचा बालिशपणा म्हटलं, तर काहींनी आगामी MI vs RCB सामन्याबाबत उत्सुकता व्यक्त केली. हा सामना 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
IPL 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी KKR विरुद्ध RCB यांच्यात होणार आहे. पण त्याआधीच सोशल मीडियावर रंगलेली ही फटकेबाजी, आगामी सामन्यांना आणखी रंगतदार बनवणार हे नक्की!






