“बलात्कार करणाऱ्याला नपुंसक करा”, राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे बेधडक विधान

On: March 11, 2025 10:37 AM
Haribhau Bagde Statement
---Advertisement---

Haribhau Bagde Statement l देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कठोर भूमिका मांडली आहे. महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप द्यायला हवा, तर बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करायला हवे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य केले.

शिवरायांच्या न्यायाची दिली आठवण :

राज्यपाल बागडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायपद्धतीचा दाखला देत बलात्काराच्या गुन्ह्यांविषयी कठोर शिक्षेची गरज असल्याचे अधोरेखित केले.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एका गावच्या पाटलाने एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यावर शिवाजी महाराजांनी आदेश दिला की गुन्हेगाराला ठार करू नका, पण त्याचे हात-पाय तोडा आणि तो मरेपर्यंत तसाच राहू द्या.”

या उदाहरणाचा संदर्भ देत गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Haribhau Bagde Statement l गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही – बागडे :

बागडे पुढे म्हणाले की, “आज गुन्हेगार कायद्याला घाबरत नाहीत. 12 वर्षांखालील मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा आहे, तरीही असे गुन्हे थांबत नाहीत. रोज न्यायालयांमध्ये अशा प्रकरणांची सुनावणी होत आहे. ही गंभीर बाब आहे.”

आजच्या काळात अत्याचार होत असताना अनेक जण फक्त व्हिडिओ शूट करतात, पण गुन्हेगाराला रोखत नाहीत, हे चुकीचे आहे. “एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर त्या नराधमाला पकडा, मारहाण करा. समाजात अशी मानसिकता रुजली तरच महिलांवरील गुन्ह्यांना आळा बसेल,” असे बागडे यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल बागडे यांच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया :

मात्र आता राज्यपाल बागडे यांच्या या विधानावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी “हे एक धाडसी मत असून, अशा कठोर शिक्षांची गरज आहे,” असे म्हटले आहे, तर काहींनी कायद्याच्या चौकटीत राहूनच शिक्षेची अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर शिक्षेचा अवलंब करावा का? बलात्कार करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा द्यावी का? या विषयावर देशभरात चर्चा रंगली आहे.

News Title: “Make Rapists Impotent” – Rajasthan Governor Haribhau Bagde’s Bold Statement

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now