“केलेले आरोप सिद्ध करुन दाखवा नाही तर राजकीय संन्यास घ्या”

On: February 6, 2023 5:58 PM
---Advertisement---

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या राजन साळवी यांच्या वर टीका करत अनेक गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना आमदार राजन साळवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे हे जे आरोप करत आहेत. ते बिनबुडाचे असून वाढत्या वयामुळे नारायण राणे यांना सारं काही विस्मरण झाले आहे अशी खोचक टीका राजन साळवी यांनी केली आहे.

मी पुन्हा एकदा नारायण राणे यांना जाहीर आव्हान देत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एन्रॉनच्या काळातील माझा ठेका सिद्ध करून दाखवा, असं साळवी म्हणालेत.

नारायण राणे हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनीसुद्धा राजकीय संन्यास घ्यावा असा जोरदार टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे वाढत्या वयासोबत तुम्ही काही गोष्टी विसरत चालला आहात असा टोला त्यांनी राणे यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now