Raja Raghuvanshi CCTV | इंदौरचे रहिवासी व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे. काळ्या शर्ट-पँटमध्ये, हातात सूटकेस घेऊन राजा रॅपिडो बाईकवर बसताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी सोनम कुठेही दिसत नाही. त्यामुळे हत्या घडण्याआधीचा हा अंतिम क्षण असल्याचे बोलले जात आहे.
राजा शिलाँगला निघण्यापूर्वीचा हा व्हिडीओ असून, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. राजा एकटाच बाहेर पडतो, हातात सूटकेस घेऊन थेट रॅपिडो बाईकवर बसतो. हाच तो सामान असल्याचेही बोलले जात आहे, जे शिलाँगमधील एका हॉटेलमध्ये नंतर सापडले होते. या व्हिडीओनंतर पोलिस तपासाला नवे वळण मिळाले आहे. (Raja Raghuvanshi)
हत्या प्रकरणात अजून तीन नावं समोर येणार? :
दरम्यान, राजाची हत्या २३ मे रोजी शिलाँगमध्ये करण्यात आली. पत्नी सोनमनेच तिच्या प्रियकर राज कुशवाह (Raj Kushwah) आणि इतर दोघांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र, राजाचा भाऊ सचिन रघुवंशी याने अजून तीन नावं समोर येणार असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. सचिनने सोनमवर तांत्रिक विधी करून मानवी बलिदान दिल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या दाव्याची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपास सुरू केला आहे. यासोबतच क्राइम सीनचा रीक्रीएशन करण्यात आला असून, विविध राज्यातील पोलिसांकडून सहकार्य घेतले जात आहे.
Raja Raghuvanshi CCTV | राजा रघुवंशीचा नवीन व्हिडीओ समोर :
मेघालय पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, केवळ प्रेमसंबंधांचा आधार न घेता अनेक शक्यतांचा तपास सुरू आहे. न्यायालयात आता दोन महत्त्वाचे साक्षीदार हजर होणार आहेत. यात सोनमच्या पालकांचाही समावेश आहे. सोनमचा भाऊही न्यायालयात साक्ष देईल, आणि ती दोषी आढळल्यास शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करेल, असं त्याने आधीच सांगितलं आहे. (Raja Raghuvanshi CCTV Video)
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला राजा रघुवंशीचा नवीन व्हिडीओ तपासात आणखी महत्त्वाची कडी ठरू शकतो. या प्रकरणाच्या तपासाला जेव्हा वाट मिळते असं वाटतं, तेव्हाच नव्या दिशा उघड होत आहेत. त्यामुळे अजून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






