“…म्हणून आम्ही राजाची हत्या केली”, अखेर राज कुशवाहने पोलिसांना सगळं सांगितलं

On: June 11, 2025 6:46 PM
rajaa raghuvanshi
---Advertisement---

Raja Raghuvanshi | मेघालयमध्ये राजा रघुवंशी यांच्या हत्येच्या सुरू असलेल्या तपासात आता नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने तिच्या पतीची हनिमूनदरम्यान हत्या करण्यासाठी राज कुशवाह आणि इतर आरोपींना १५ लाख रुपये दिले होते.

नक्की काय घडलं?

मेघालय पोलिसांनी सांगितले की, राज कुशवाहने सुरुवातीला शिलाँगला जाण्याचा बेत रद्द केला होता आणि इतरांनाही तसेच करण्यास सुचवले होते, परंतु सोनमनेच हत्येचा आग्रह धरला. इंदूरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने, जो मेघालय पोलिसांसोबत तपासात काम करत आहे. दरम्यान माध्यमांशी बोलत असताना पोलिसांनी सांगितलं की, “राज कुशवाहचा दावा आहे, त्याला सोनमला पाठिंबा द्यायचा नव्हता आणि शेवटच्या क्षणी त्याने मेघालयला जाण्याचा आपला बेत रद्द केला. त्याने इतर तिघांनाही जाऊ नका असे सांगितले होते, परंतु सोनमने तिकीट बुक केल्यानंतर ते तिघे मेघालय पाहण्यासाठी गेले.”

तो अधिकारी पुढे म्हणाला, “शेवटच्या क्षणीही त्या तिघांनी राजाला (Raja Raghuvanshi) मारण्यास नकार दिला, पण सोनमने आग्रह धरला आणि त्यासाठी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. पोलीस या दाव्यांची पडताळणी करत आहेत.” या अधिकाऱ्याने असाही दावा केला की, सोनमने तिच्या पतीच्या पाकिटातून १५,००० रुपये रोख रक्कम काढून आरोपींना दिली होती.

राजाला मारल्यानंतर सोनम इंदूरला येऊन राजला भेटली?

राजाची (Raja Raghuvanshi) हत्या केल्यानंतर सोनम इंदूरला परतली होती. पोलिसांनी असाही दावा केला आहे की, सोनमने राजाला मारल्यानंतर इंदूरला परत येऊन राजला भेटली, ज्याला पोलीस तिचा प्रियकर मानत आहेत. मेघालय पोलिसांनी सांगितले की, ती राजला एका भाड्याच्या खोलीत भेटली होती आणि पुढील कृतींच्या योजनेवर चर्चा केली होती.

पोलिसांनी असाही आरोप केला आहे की, सोनम तपासावर परिणाम करण्यासाठी हेतुपुरस्सर अधिकाऱ्यांना गोंधळात टाकत होती. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत आणि रेल्वे रेकॉर्डवरून असे दिसून येते की, तिने पोलिसांना चकवा देण्यासाठी आणि फ्लाइट रेकॉर्डमधून सुटून जाण्यासाठी २३-२४ मे नंतर गुवाहाटीहून पाटण्याला ट्रेन घेतली असावी.

News Title  – raja raghuvanshi death case raj kushwah reveals truth

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now