Raj Thackeray l राज्यात महायतीकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
राज ठाकरेंनी वर्तवला अंदाज :
यंदाच्या विधानसभेत महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? व कोणत्या पक्षाचा होणार? यावर सध्या महायुतीकडून कोणतेही भाष्य केलेलं नाही. मात्र यासंदर्भात राज ठाकरे यांनी 2024 चा मुख्यमंत्री भाजप पक्षाचा होईल असे म्हटले आहे. याशिवाय पुढील पंचवार्षिकमध्ये म्हणजेच 2029 मध्ये मुख्यमंत्री हा मनसेचा होईल असे भाकित देखील राज यांनी वर्तवले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या भाकितामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या विधानसभेत मनसेने अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
Raj Thackeray l कोण होणार मुख्यमंत्री? :
याशिवाय राज ठाकरेंनी चलो रे चा नारा हाती घेतला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत निकालाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या या भाकितामुळे देवेंद्र फडणवीस हे यंदाच्या वर्षी मुख्यमंत्री होतील असा अंदाज वर्तवला आहे.
मात्र 2029 मध्ये मनसे मुख्यमंत्री पदाचा दावेदार असणार असं राज ठाकरेंनी सांगितल्यावर राजकीय दृष्ट्या ही बाब विचार करण्यायोग्य असल्याचं बोललं जात आहे.
News Title – raj thackeray says political future of 2024
महत्त्वाच्या बातम्या-
अमित शाह महाराष्ट्रात जादूची कांडी फिरवणार? ‘इतक्या’ सभा घेणार
मनसेला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा धक्का!
पालघरमध्ये मोठा राजकीय ड्रामा, आता संपूर्ण वनगा कुटुंब बेपत्ता
नरक चतुर्दशीला करा ‘हे’ काम, जीवनात सुख-समृद्धीसह येईल भरभराट!






