Rain Update | महाराष्ट्रात उष्णतेनं हैराण केलं आहे. अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. अनेकजण उष्मघाताने मृत्यूमुखी पडले. अनेकजण आता मान्सूनची वाट पाहत आहेत. यंदा केरळ येथे मान्सूनने लवकर हजेरी लावली होती. येत्या पाच दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Rain Update)
बंगालच्या उपसागरापासून वाहत असलेले जोरदार वाऱ्यामुळे आणि ईशान्य आसामवर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पुढील पाच दिवसांमध्ये ईशान्याकडील राज्यांमध्ये हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अरूणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणीपूर, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येणारे पाच दिवस आणखी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी दिल्ली-एनसीआरमध्ये वातावरण थंड राहिल. (Rain Update)
वादळी वाऱ्यासह पाऊस होणार
मेघालय, पश्चिम बंगालच्या पर्वताजवळील भागात आणि सिक्कीममध्ये 6 ते 10 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. तसेच अरूणाचल प्रदेश येथे 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता आहे. नागालँडमध्ये 10 जून रोजी पावसाची शक्यात आहे. येत्या पाच दिवसांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकातही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. (Rain Update)
महाराष्ट्रासह ‘या’ भागातही पावसाची शक्यता
राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, 6 ते 10 जून रोजी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा येथे 6 ते 8 जून पर्यंत पावसाची शक्यता आहे. येत्या 10 जून रोजी मान्सून राज्यामध्ये दाखल होणार असल्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी मान्सून हा केरळमध्ये लवकर दाखल झाल्याने देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये पोहोचायला सुरूवात झाल्याचं समजतंय.
हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रमाणात हिंगोलीकरांना पवासामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
News Title – Rain Update Next 5 Days Heavy Rain In Maharashtra State
महत्त्वाच्या बातम्या
“..महिन्यातच मोदी सरकार कोसळणार”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
“दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या”; पुण्यात जोरदार घोषणाबाजी
‘CISF च्या महिला जवानने माझ्या कानाखील मारली’; कंगनाचा गंभीर आरोप
“मोदी-शहांचा शेअर मार्केटमध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा”; राहुल गांधींच्या आरोपांनी देशभर खळबळ
‘अजित पवारांनी गुरंढोरं सांभाळावीत’; ‘या’ नेत्याचा अजितदादांना खोचक सल्ला






