Raigad Lok Sabha Result 2024 | रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे विजयी झाले आहे. तटकरे हे 82 हजार 784 हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. सुरुवातीपासून तटकरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांचे तटकरे हे एकुलते एक उमेदवार आहेत, जे विजयी ठरले आहेत.
सुनिल तटकरे विजयी
रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते उभे राहिले होते. सुनिल तटकरे यांनी सलग दुसऱ्यांदा अनंत गीतेंचा परभाव केला असून त्यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. या मतदारसंघात दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.
अनेक दिग्गज नेत्यांना या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. अखेर येथे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी बाजी मारली आहे. रायगड येथे 58.10 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2019 च्या तुलनेत हे मतदान 7 टक्के कमी आहे.
उद्धव ठाकरे गटाला फटका
रायगड लोकसभेत रायगडमधील पेण,अलिबाग,श्रीवर्धन आणि महाड हे चार मतदार संघ येतात. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली आणि गुहागर या मतदार संघांचा समावेश होतो. येथे 2009 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती.15 लाख 32 हजारांहून अधिक मतदार असलेली ही जागा शिवसेनेने दोनदा काबीज केली आहे. यावेळी येथे अजित पवार गटाने बाजी मारल्याचं दिसतंय.
News Title – Raigad Lok Sabha Result 2024
महत्त्वाच्या बातम्या –
फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर
भाजपवाले कोणाचेच नाहीत; संजय राऊतांच विधान चर्चेत
‘बच्चा बडा हो गया’, सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं






