मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय

Rahul Gandhi Lok Sabha Election Result | वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर कॉँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी हे विजयी झाले आहेत.त्यांनी रायबरेली, वायनाड या जागांवर तीन लाख मतांच्या फरकांनी विजय मिळवला आहे. राहुल गांधी यांना या जागेवर आतापर्यंत 6 लाख 47 हजार 445 मतं पडली आहेत. या जागेवर कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवार अॅनी राजा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

राहुल गांधी विजयी

अॅनी राजा यांना 2 लाख 83 हजार 23 मतं मिळाली आहेत. तर, भाजपचे के सुरेंद्रन हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना 1 लाख 41 हजार 45 हजार मतं मिळाली आहेत. येथे राहुल गांधी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राहुल गांधी येथून विजयी झाल्याचे आता गृहीत धरले जात आहे. कॉँग्रेसकडून याचा जल्लोष देखील केला जात आहे.

दुसरीकडे रायबरेली मतदारसंघातूनदेखील राहुल गांधी (Rahul Gandhi Lok Sabha Election Result) सर्वांत पुढे आहेत.सध्या त्यांना 6 लाख 84 हजार 598 मते पडली आहेत. या जागेवर भारतीय जनता पार्टीचे दिनेश सिंह हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 2 लाख 95 हजार 856 मते पडली आहेत.त्यामुळे राहुल गांधी येथे 3 लाख 88 हजार 742 मतांनी आघाडीवर आहेत.

वायनाड आणि रायबरेलीमध्ये राहुल गांधी विजयी

कॉँग्रेससाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे. इंडिया (Rahul Gandhi Lok Sabha Election Result)आघाडीने देखील प्रभावी कामगिरी करून दाखवली आहे. इंडिया आघाडी सध्या 236 जागांवर पुढे आहे. तर, दुसरीकडे एनडीए 295 जागांनी आघाडीवर आहे. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. या आकडेवारीनंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय.

News Title –  Rahul Gandhi Lok Sabha Election Result

महत्त्वाच्या बातम्या –

रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं?

महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!

फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर

भाजपवाले कोणाचेच नाहीत; संजय राऊतांच विधान चर्चेत

‘बच्चा बडा हो गया’, सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं