राहुल गांधी खाली पडले अन् पोलिसांनी क्षणात उचलून घेतलं; पाहा व्हिडीओ

On: July 21, 2026 8:01 PM
rahul gandhi delhi protest
---Advertisement---

Rahul Gandhi | दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, काँग्रेसने या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ताब्यात घेताना झाला गोंधळ :

धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर तीन ते चार तास ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळ रिकामे करण्यासाठी कारवाई सुरू करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पुढे सरसावल्यानंतर काही काळ गोंधळ उडाला. समोर आलेल्या व्हिडीओनुसार, राहुल गांधी जमिनीवर बसले किंवा झोपल्याचे दिसत असून त्यांना उचलण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षक आणि पोलिसांमध्येही धावपळ झाली. काही वेळानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना उचलून वाहनात नेले. या संपूर्ण घटनेचे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

Rahul Gandhi | काँग्रेसची सरकारवर टीका :

या घटनेनंतर काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर संबंधित व्हिडीओ पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षाच्या नेत्याशी अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत पक्षाने या कारवाईला हुकूमशाहीचे उदाहरण म्हटले. या पोस्टनंतर हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागल्यानंतर अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला.

News Title: Rahul Gandhi Detention Video Viral

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now