“इंडिया आघाडीचं सरकार बनताच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल”

On: May 29, 2024 7:23 PM
Rahul Gandhi big announcement on Farmer loan waiver
---Advertisement---

Rahul Gandhi | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आता 1 जून रोजी पार पडणार आहे. तर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागेल. यापूर्वीच कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. पंजाबमध्ये एका ठिकाणी बोलताना राहुल गांधी यांनी घोषणा केली आहे.

पंजाबमधील लुधियाना येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकरी कर्जमाफी आयोगाची स्थापना करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

काय म्हणाले राहुल गांधी?

“आमचं सरकार आलं तर, लगेच आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जसे भाजप अब्जाधीशांचे कर्ज माफ करतात तसेच आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु त्यासाठी आम्ही एक आयोग स्थापन करू, ज्याला शेतकरी कर्जमाफी आयोग म्हटले जाईल”, असं राहुल गांधी म्हणाले.

“ज्यावेळी कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग सरकारला कळवेल आणि आम्ही कर्जमाफी करू.”, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली आहे. फक्त एकदाच नाही तर, ज्यावेळी शेतकऱ्यांना गरज असेल तेव्हा आम्ही कर्ज माफ करू, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले आहेत.

“शेतकऱ्यांना हमीभावासह कायदेशीर एमएसपी देऊ”

निवडणुकांनंतर इंडिया आघाडी सरकार 4 जून रोजी येईल आणि आम्ही पहिल्यांदाच शेतकऱ्यांना हमीभावासह कायदेशीर एमएसपी देऊ, असंही गांधी म्हणाले आहेत. 4 जूननंतर इंडिया आघाडीचं सरकार येईल की पुन्हा मोदी सत्तेवर येणार हे लवकरच ठरेल.

यावेळी राहुल गांधी यांनी पंजाबमधील ड्रग प्रकरणावरही भाष्य केलं. पंजाबमध्ये ड्रग्जचा मुद्दा वाढत आहे यावर कडक कारवाई करावी, पंजाबने अंमली पदार्थांविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढले पाहिजे, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi ) म्हणाले.

News Title –  Rahul Gandhi big announcement on Farmer loan waiver

महत्वाच्या बातम्या- 

“अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे, त्यांच्यामुळे..”; पुणे अपघातप्रकरणी नवी माहिती समोर

“आव्हाडांनी बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी, अन्यथा..”

जितेंद्र आव्हाडांनी चुकून फाडला बाबासाहेबांचा फोटो, राजकीय वातावरण तापलं

इटलीतील आलिशान क्रुझवर होणार अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा; पाहा PHOTO

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल

Join WhatsApp Group

Join Now