Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडसह (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
राधिकाने गेल्या वर्षी एका मुलीला जन्म दिला. बाळंतपणानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राधिका कामावर परतली आहे. आईपण आणि काम सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
‘बाफ्टा’ (BAFTA) सोहळ्यातील फोटो व्हायरल
नुकतेच राधिकाने ‘बाफ्टा’ (BAFTA) पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. तेथील पडद्यामागचा एक फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोमध्ये राधिका तिच्या मुलीसाठी ब्रेस्ट मिल्क (Breast Milk) काढताना दिसत आहे. काम करताना एका आईसमोर असणारे आव्हान तिने या फोटोतून दाखवले आहे. मात्र, तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी (Netizens) नाराजी व्यक्त केली आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे.
फोटोतील दृश्य आणि कॅप्शन
राधिकाने (Radhika Apte) शेअर केलेल्या फोटोमध्ये ती वॉशरूममध्ये (Washroom) उभी असलेली दिसते. तिच्या एका हातात ब्रेस्ट मिल्क पंपिंग मशीन (Breast Milk Pumping Machine) आणि दुसऱ्या हातात शॅम्पेन (Champagne) आहे. तिने फोटोला कॅप्शन (Caption) दिले आहे, “बाफ्टामधलं (BAFTA) माझं वास्तव. मला नताशाचे (Natasha) आभार मानायला हवेत, कारण तिच्यामुळे मला बाफ्टा सोहळ्याला उपस्थित राहता आले. माझ्या ब्रेस्टपंपच्या (Breast Pump) वेळेनुसारच तिने माझे शेड्युल (Schedule) ठरवले. ती माझ्यासोबत वॉशरुममध्ये तर आलीच, पण सोबत शॅम्पेनही (Champagne) घेऊन आली.”
Title : Radhika Apte Photo from BAFTA Ceremony Goes Viral








