Pune Swargate Case | स्वारगेट बसस्थानकावरील (Swargate Bus Stand) बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police) युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तो शिरूरमधील (Shirur) ऊसाच्या शेतात लपून बसल्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी ड्रोनद्वारे (Drone) इमेजिंग (Imaging) सुरू केले आहे.
गुन्हे शाखेकडून शोधमोहीम
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) विविध पथकांनी शिरूरमध्ये गाडेचा शोध सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो ऊसाच्या शेतात लपला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिस त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
घटनेनंतर दुपारी २ वाजल्यापासून गाडेचा फोन बंद आहे. तो थेट शिरूरकडे पळाल्याचे समजते. दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ दिसायला सारखे असल्यामुळे तपासात अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार
दत्तात्रय गाडेवर यापूर्वी शिक्रापूर (Shikrapur) येथे २ गुन्हे, तसेच शिरूर, कोतवाली (Kotwali), सुपा (Supa) आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात (Police Station) एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आता १५ पथके तैनात केली आहेत. तसेच, आरोपीला फरार घोषित करण्यात आले असून, त्याची माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
Title : Pune Swargate Case Accused Dattatray Gade Hiding in Sugarcane Field






