स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळ झालं सतर्क, उचललं मोठं पाऊल

On: March 15, 2025 9:09 AM
Pune ST news 72 Buses to Be Auctioned on March 21
---Advertisement---

Pune ST news | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटनेनंतर एसटी महामंडळाने सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत, दीर्घकाळापासून अडगळीत पडलेल्या आणि नादुरुस्त झालेल्या 72 बस गाड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune ST news )

स्वारगेट प्रकरणानंतर महत्त्वाचे पाऊल

25 फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर एसटी महामंडळाने बसस्थानकांवरील सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला.

पुणे विभागीय कार्यालयाच्या आवारात गेल्या वर्षभरापासून निकामी झालेल्या 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बसेस अडगळीत पडून होत्या. या बसेसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली जात होती तसेच त्यातील साहित्य चोरीचे प्रकारही घडले होते.

21 मार्चला बसेसचा लिलाव

या नादुरुस्त बसेसचा लिलाव 21 मार्च रोजी होणार असून, यामधून सुमारे 2.50 ते 3 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. महामंडळाच्या म्हणण्यानुसार, या लिलावातून मिळणाऱ्या निधीचा वापर इतर सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी केला जाईल.

100 बस थांबे संवेदनशील म्हणून निश्चित

एसटी महामंडळाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 42 बस स्थानकांमध्ये 100 संवेदनशील बस थांबे निश्चित केले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune ST news )

चांदणी चौक, कात्रज, रावेत आणि हिंजवडी फाट्यासारख्या भागांत प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिस प्रशासनाच्या मदतीने सुरक्षाव्यवस्था बळकट केली जाणार आहे.

Title : Pune ST news 72 Buses to Be Auctioned on March 21

 

Join WhatsApp Group

Join Now