Pune Porsche Accident | पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने दारूच्या नशेत दोघांना कारने चिरडले. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघा जणांनी आपले प्राण गमावले आहे. या घटनेनंतर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.
काल विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी ठोठावली आहे. तर, आता चौकशी दरम्यान विशाल अग्रवाल यांनी सर्व घटनेबद्दल कबुली दिलीये.आपल्या अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केल्याचं विशाल अग्रवाल याने म्हटलं आहे.
आरोपी मुलाच्या वडिलांची कबुली
विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन वेदांत हा बार आणि पबमध्ये गेला होता. त्यावेळी प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, व्यवस्थापक सचिन काटकर, बार व्यवस्थापक (Pune Porsche Accident ) जयेश बोनकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल याच्यासह तीन आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, कोर्टाने 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
कोर्टात काय युक्तिवाद झाला?
पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता. मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. फरार विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून पकडण्यात आलं. अशी माहिती कोर्टात दिली. तसंच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा असल्याने विशालला सात दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी देखील पोलिसांकडून करण्यात आली होती.
दरम्यान, अल्पवयीन आरोपी मुलाचा जामीन रद्द झाला (Pune Porsche Accident) असून त्याला बाल सुधारणा गृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिलाय. बाल हक्क न्यायालयाच्या या निर्णयानंतर या आरोपीला बाल निरीक्षणगृह येथे ठेवण्यात येणार आहे.
News Title – Pune Porsche Accident Vishal Agrwal Confession
महत्त्वाच्या बातम्या-
“तरूण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का?”, वसंत मोरे संतापले
‘या’ शहरांना पेट्रोल दरवाढीचा झटका; जाणून घ्या आजचे इंधनदर
शाहरुख खानवर अजूनही उपचार सुरू?; हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर
बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा






