पुण्यातील पोलिस भरती रखडली; सव्वा लाख उमेदवारांची प्रतीक्षा कायम

On: January 22, 2025 10:57 AM
Pune Police Recruitment Delayed Over One Lakh Candidates Waiting
---Advertisement---

Pune Police Recruitment | राज्याच्या गृहमंत्रालयाने (Home Ministry) २०२२-२३ या वर्षासाठी पोलीस भरतीची (Police Recruitment) घोषणा करून जवळपास एक वर्ष उलटले आहे. (Pune Police Recruitment)

राज्यातील इतर ठिकाणच्या पोलीस भरतीच्या अर्ज, परीक्षा आणि नियुक्त्या पूर्ण होत असताना, पुणे (Pune) शहरातील पोलीस भरती मात्र अद्याप रखडलेलीच आहे. यामुळे पुण्यातील सुमारे सव्वा लाख उमेदवारांमध्ये (Candidates) नाराजीचे वातावरण असून, भरती प्रक्रिया कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उमेदवारांकडून वारंवार विचारणा होत असताना देखील प्रशासनाकडून (Administration) कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. या विलंबामुळे उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

कारागृह पोलीस भरतीचाही (Jail Police Recruitment) पत्ता नाही

पुणे कारागृह (Pune Jail) पोलीस भरतीची प्रक्रिया देखील अद्याप पूर्ण झालेली नाही. ५१३ जागांसाठी गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या भरतीसाठी तब्बल एक लाख तीस हजार अर्ज आले होते. जाहिरात येऊन दहा महिने उलटले, तरीही परीक्षा झालेली नाही, याकडे महाराष्ट्र अॅकॅडमीचे (Maharashtra Academy) विठ्ठल बडे (Vitthal Bade) यांनी लक्ष वेधले आहे. (Pune Police Recruitment)

उमेदवारांची मागणी

राज्यातील इतर ठिकाणची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असताना, पुणे शहरातील भरती प्रक्रिया का रखडली आहे, असा सवाल उमेदवारांकडून विचारला जात आहे. भरती प्रक्रियेला वेग देऊन लवकरात लवकर परीक्षा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

भरती प्रक्रियेतील विलंबाबाबत प्रशासनाने (Administration) खुलासा करावा आणि भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Pune Police Recruitment)

Title : Pune Police Recruitment Delayed Over One Lakh Candidates Waiting

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now