Pune Election Result | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांचे पहिले कल समोर येताच राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. पुण्यात भाजप 32 ठिकाणी आघाडीवर असून दोन्ही राष्ट्रवादी मिळून 14 जागांवर आघाडीवर आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्याच तासात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत सुरू असून दोन्ही पक्ष समसमान जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. (Pune Election Results 2026)
पुण्यामध्ये मुख्य लढत भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये रंगली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप काहीशी आघाडीवर दिसत असली तरी राष्ट्रवादीकडून जोरदार टक्कर दिली जात आहे. पिंपरीतही तसंच चित्र असून प्रत्येक फेरीसोबत आघाडी बदलताना दिसत आहे, त्यामुळे निकाल शेवटपर्यंत चुरशीचे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात भाजपची आघाडी, राष्ट्रवादीची टक्कर :
पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजप उमेदवारांची आघाडी कायम असून स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित हे चारही उमेदवार पुढे आहेत. तर गजा मारणे यांच्या पत्नीला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीचा सामना करावा लागत आहे. ‘मूळ पुणेकरांचा प्रभाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.
पहिल्या कलांनुसार पुणे महापालिकेत भाजप 39 जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी (अजित पवार गट) 10 आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) 4 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गट 2, काँग्रेस 2 तर उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अद्याप शून्यावर आहे.
Pune Election Result | पिंपरी-चिंचवडमध्ये अटीतटीची लढत :
पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad result) एकूण 128 जागांसाठी मतमोजणी सुरू असून भाजप 15 जागांवर, राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 2, राष्ट्रवादी (शरद पवार) 1 जागेवर पुढे असून काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे आणि इतर पक्ष सध्या आघाडीवर नसल्याचं दिसत आहे. (Pune Election Result)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये भाजप आणि अजित पवार गटामधील ही लढत आगामी राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात असून पुढील काही फेऱ्यांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता कायम आहे.






