पुणेकरांनो पालखी आगमनामुळे शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

On: July 9, 2026 2:23 PM
Pune Palkhi
---Advertisement---

Pune Palkhi | आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुणे (Pune) शहरात आगमन होत आहे. लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने पालखी मार्गावरील नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पालखी मार्ग, दर्शन आणि मुक्कामाची व्यवस्था :

देहू (Dehu) येथून संत तुकाराम महाराजांच्या आणि आळंदी (Alandi) येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी पंढरपूर (Pandharpur) वारीसाठी प्रस्थान केले असून, गुरुवार 9 जुलै 2026 रोजी दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होत आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर पालख्या वाकडेवाडी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, संचेती रुग्णालय, फर्ग्युसन रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक आणि लक्ष्मी रस्ता या मार्गाने आपल्या मुक्कामस्थळी पोहोचतील.

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी राहणार असून, संत तुकाराम महाराजांची पालखी जवळील निवडुंगा विठोबा मंदिरात विसावणार आहे. पालख्यांसोबत आलेल्या दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था महापालिका शाळांमध्ये करण्यात आली आहे. याच परिसरात भाविकांना दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Pune Palkhi | वाहतूक निर्बंध आणि पार्किंगची सुविधा :

पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवाजीनगर, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच पालखी मार्गालगतच्या परिसरात प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भाविकांच्या सोयीसाठी शहरातील 10 ठिकाणी विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालय, ऑर्नेलास हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व कला महाविद्यालय, लक्ष्मी मार्केट, स. गो. बर्वे प्राथमिक विद्यालय, रफी अहमद किडवाई हायस्कूल, शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय, मार्कंडेय विद्यालय आणि सावित्रीबाई फुले शाळा या ठिकाणांचा समावेश आहे. भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

News Title: Pune Palkhi Arrival Traffic Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now