पुणे हादरलं! उच्चशिक्षित आईने पोटच्या मुलांना गळा दाबून संपवलं, नवऱ्यावरही केले वार

On: February 8, 2025 7:15 PM
Pune News Woman Murders Her Two Children Attacks Husband in Pune
---Advertisement---

Pune News | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील स्वामी चिंचोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली. एका उच्चशिक्षित आईने आपल्या पोटच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली. इतकेच नाही, तर तिने आपल्या पतीवरही धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. (Pune News )

या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी महिलेचे नाव कोमल मिंडे आहे. तिने 1 वर्षाचा मुलगा शंभू मिंडे आणि 3 वर्षांची मुलगी पियू मिंडे यांची हत्या केली. कोमलने दोन्ही मुलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर पती दुर्योधन मिंडे यांच्यावर कोयत्याने वार केले. दुर्योधन यांच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

दोन्ही मुलांचा गळा दाबून खून नंतर…

दुर्योधनमिंडे हे आयटी इंजिनिअर असून पुण्यातील खराडी येथील एका आयटी कंपनीत कामाला आहेत. सध्या ते ‘वर्क फ्रॉम होम’ करत होते. स्वामी चिंचोली येथे त्यांचा बंगला आहे. शुक्रवारी रात्री जेवणानंतर सर्वजण झोपी गेले. शनिवारी पहाटे कोमलने दोन्ही मुलांची हत्या केली आणि पतीवर हल्ला केला.

घटनेनंतर दुर्योधन यांना तातडीने बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोमलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत.

हत्येचे कारण अस्पष्ट:

हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, महिलेने संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या हेतूनेच हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. (Pune News )

Title : Pune News Woman Murders Her Two Children Attacks Husband in Pune

 

Join WhatsApp Group

Join Now