दोन दिवसांपूर्वी पुण्यात राहायला आलेली महिला; अचानक खून झाल्याने एकच खळबळ

On: January 26, 2025 1:09 PM
Double Murder
---Advertisement---

Pune News | पुण्यात अवघ्या दोन दिवसांपूर्वी राहायला आलेल्या एका महिलेचा खून (Murder) झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या डोक्यात प्रहार करून तिचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर तिचा पती फरार झाला असून खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Pune News )

भवानी पुनेंदु मंडल (वय २२, रा. नथ्थु लांडगे चाळ, छत्रपती शिवाजी चौक, कासारवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती पुनेंदु मंडल (वय अंदाजे ३२, रा. ओडिशा) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना २३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता उघडकीस आली. याबाबत संतोष नथु लांडगे (वय ४८, रा. नथु लांडगे चाळ, शिवाजी चौक, कासारवाडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात (Dapodi Police Station) फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच राहायला आले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी आणि पुनेंदु मंडल हे दोघे मंगळवारी कासारवाडी येथील नथ्थु लांडगे चाळीत भाड्याने राहण्यासाठी आले होते. मूळचे ओडिशाचे (Odisha) असलेले हे दांपत्य बिगारी काम करत होते.

भवानी हिने घराच्या डिपॉझिटसाठी (Deposit) एका व्यक्तीकडून पाचशे रुपये उसने घेतले होते आणि ते दोन दिवसांनी परत करण्याचे आश्वासन दिले होते. (Pune News )

उसने घेतलेले पैसे आणि उघडकीस आलेला प्रकार

उसने घेतलेले पैसे परत घेण्यासाठी संबंधित व्यक्ती लांडगे चाळीत आली. त्याने घरमालकाला भवानी कोठे राहते असे विचारले. घरमालकाने त्यांना चाळीतील खोली दाखविली. मात्र, खोलीचा दरवाजा केवळ लोटलेला होता. या घटनेमुळे घातपाताचा संशय बळावला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Pune News )

Title: Pune News woman murdered in pune husband absconding

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now